श्रीनगर - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून अनेक देश त्याचा सामना करत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जम्मू-काश्मीरसह देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तर दुसरीकडे सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. याच दरम्यान जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. तसेच गोळीबारासह मोठया प्रमाणावर तोफगोळयांचा मारा करण्यात आला. यामध्ये एक जवान शहीद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजौरीमध्ये पाकिस्तानकडून मोठया प्रमाणावर गोळीबार करण्यात आला. यामध्ये भारताचा एक जवान शहीद झाला असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत. भारताने देखील पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये सोमवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीदरम्यान चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं होतं.
जवळपास 6 सहा महिन्यांच्या कालावधीत सुरक्षा दलाने 93 दहशतवाद्यांना कंठस्थान कंठस्नान घालून मोठं यश मिळवले आहे. या दहशतवाद्यांमध्ये टॉप लीडर असलेल्या दहशतवाद्यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी एकत्र येत जैश-ए-मोहम्मदच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. नियंत्रण रेषा (एलओसी) आणि दुर्गम भागात दहशतवादविरोधी संघटना आणि त्यांच्या म्होरक्यांविरोधात मोहीम उभारली आहे. दोन टॉप दहशतवादी लीडर रियाझ नायकू आणि जुनैद सेहराई यांच्यासह परदेशी दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाने खात्मा केला होता. जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा आणि पाकिस्तानी दहशतवादी संघटनांचे हे दहशतवादी असल्याचे उघडकीस आले आहे. आगामी काळात दहशतवाद्यांनी पाकिस्तानमधून काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला असता काश्मीर खोऱ्यात चकमकींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
भारतीय लष्कराला सलाम! चीनच्या तज्ज्ञांनीही केलं भरभरून कौतुक!!
CoronaVirus News : पावसाळ्यात कोरोनाचा संसर्ग अधिक वेगाने होणार?; IIT चा चिंता वाढवणारा रिसर्च