श्रीनगर:जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा टार्गेट किलिंगची घटना घडली आहे. यावेळेस दहशतवाद्यांनी राज्याबाहेरील व्यक्तीला नाही, तर काश्मिरी पंडितांवर निशाणा साधला आहे. काश्मीर झोनमधील शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांनी एका काश्मिरी पंडिताची गोळ्या झाडून हत्या केली आहे.
टार्गेट किलिंगच्या घटनांमध्ये वाढ जम्मू-काश्मीरमध्ये यावर्षी एप्रिल-मे महिन्यात टार्गेट किलिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 12 मे रोजी बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या. तहसील कार्यालयात घुसून दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित राहुल भट्ट नावाच्या अधिकाऱ्याला लक्ष्य केले. रुग्णालयात उपचारादरम्यान राहुलचा मृत्यू झाला.
महिला शिक्षिकेची गोळ्या झाडून हत्यायानंतर 31 मे रोजी कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी रजनीबाला या महिला शिक्षिकेची गोळ्या झाडून हत्या केली होती. ती सांबा येथील रहिवासी होती. कुलगाममधील गोपालपोरा येथे त्यांची हत्या करण्यात आली. रजनी या गोपाळपोरा हायस्कूलमध्ये शिक्षिका होत्या. गोळीबारानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
2 जून रोजी बँक व्यवस्थापकावर गोळीबारयानंतर 2 जून रोजी राजस्थानमधील हनुमानगढ येथील रहिवासी कुलगाममधील बँक मॅनेजरवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात बँक व्यवस्थापक विजय कुमार यांचा मृत्यू झाला. विजय कुमार हे कुलगाममधील मोहनपोरा येथील देहाती बँकेत तैनात होते. टार्गेट किलिंगच्या या घटना घडवणाऱ्या बहुतांश दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले आहे.