श्रीनगर - जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जम्मू-काश्मीरसह देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तर दुसरीकडे सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये शनिवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील निपोरा परिसरामध्ये शनिवारी (13 जून) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे. दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.
जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये गुरुवारी नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. तसेच गोळीबारासह मोठया प्रमाणावर तोफगोळयांचा मारा करण्यात आला. यामध्ये एक जवान शहीद झाला. अनेक नागरिक जखमी झाले आहेत. भारताने देखील पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.सोमवारी ( 8 जून) शोपियान जिल्ह्यातील पिंजोरा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीदरम्यान चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.
जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात रविवारी सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांत मोठी चकमक झाली होती. जवानांनी 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. सुरुवातीला झालेल्या गोळीबारानंतर रेबन गावात सुरू असलेला गोळीबार काही वेळासाठी थांबा होता. मात्र तो पुन्हा सुरू झाला. सुरक्षा दलाचे जवान दहशतवाद्यांना शोधत असतानाच, दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर ही चकमक उडाली. यामध्ये 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले होते.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : काय सांगता? PPE किट घालून कोरोनाग्रस्त आरोपीने रुग्णालयातून काढला पळ
CoronaVirus News : लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांनी केला मोठा खुलासा, म्हणाले...
CoronaVirus News : अमेरिकेत भारतीय वंशाच्या डॉक्टरची कमाल; कोरोना रुग्णावर केली यशस्वी शस्त्रक्रिया
CoronaVirus News : मृत्यूनंतरही होताहेत हाल! 14 मृतदेहांचा 'तो' धक्कादायक Video व्हायरल