शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

जम्मू काश्मीर : दहशतवादी हल्ल्यात 3 जवान जखमी

By admin | Published: July 08, 2017 7:52 AM

जम्मू-कश्मीरमधील बांदीपोरा येथे दहशतवाद्यांनी भारतीय लष्करातील सैनिकांवर हल्ला केल्याचे वृत्त समोर आले आहे.

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 8 - जम्मू-कश्मीरमधील बांदीपोरा येथे दहशतवाद्यांनी भारतीय लष्करातील सैनिकांवर हल्ला केल्याचे वृत्त समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्यात तीन जवान जखमी झाले आहे. हा हल्ला बांदीपोरामधील हाजिन परिसरात झाला आहे. हल्ल्यानंतर तातडीनं जवानांकडून परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. 
 
दरम्यान, भारतीय सुरक्षा दलानं हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीला कंठस्नान घातल्याच्या घटनेला आज (8 जुलै) एक वर्ष पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर काश्मीर खो-यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी काश्मीर खो-यात 20 हजारहून अधिक जवान तैनात करण्यात आले आहेत. शिवाय अमरनाथ यात्रेसाठी आलेल्या यात्रेकरुंच्या सुरक्षेसंदर्भातही योग्य ती पाऊले उचलण्यात आली आहेत.
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फुटरतावादी आणि दहशतवादी संघटनांनी बुरहान वानीच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं खो-यात कार्यक्रमांचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. 
 

 J&K: Two army jawans injured in a terror attack in Hajin area of Bandipora. More detail awaited

— ANI (@ANI_news) July 8, 2017

आणखी बातम्या वाचा 

(लष्कराची मोठी कारवाई, सहा महिन्यात 92 दहशतवादी ठार)
(जम्मू काश्मीर : AK-47सहीत टेरिटोरियल आर्मीचा जवान बेपत्ता)
दरम्यान,  हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानीचा खात्मा होऊन आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर काश्मीर खो-यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी राज्य सरकार आणि पोलिसांनी परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. 
 
याचे कारण म्हणजे 8 जुलैला दहशतवादी अथवा फुटिरतावाद्यांना कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यास संधी मिळू नये. 8 जुलै 2016 ला भारतीय सुरक्षा दलानं बुरहानी वानीला कंठस्नान घातले होते. यानंतर काश्मीर खो-यात अनेक महिने हिंसाचार उफाळला होता. 
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुरहान वानीच्या मृत्यूला 1 वर्ष झाल्याच्या निमित्त फुटिरतावादी आणि दहशतवादी संघटनांनी आज कार्यक्रमांचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. हुर्रियत नेता आणि हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दीननं काश्मीर खो-यात बंदची हाक दिली असून संपूर्ण आठवडा निदर्शनं करण्याचे आवाहन केले आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, हिजबुलनं काश्मीर खो-यातील तरुणांना दहशतवादी संघटनेत सहभागी करुन घेण्यासाठी भरती मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यांसदर्भात दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग, पुलवामा, कुलगाम आणि शोपिया या चार जिल्ह्यातील नागरिकांना तर फार आधीपासून बुरहानचं गाव त्रालमध्ये एकत्र जमण्यासाठी संदेश देण्यात आला आहे. कमीत कमी 200 तरुणांना संघटनेत सहभागी करुन घेणे आणि त्यांना पोलिसांकडील शस्त्रास्त्र हिसकावण्याचे प्रशिक्षण देण्याचे हिजबुल मुजाहिद्दीनचं लक्ष्य आहे. 
 
यावर अनंतनागचे एसएसपी अल्ताफ अहमद यांनी सांगितले की, खबरदारी म्हणून दगडफेक करणा-यांवर 8 जुलैला करडी नजर ठेवण्यात येणार आहे. सरकारी शाळा व कॉलेजांना 10 जुलैपर्यंत सुट्टी आहे. तर स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांत रडवानी, खुवानी आणि कुइमोह गावांतील 6 हून अधिक तरुण बेपत्ता झाले  आहेत.  हे तरुण दहशतवादी संघटने सहभागी झाल्याची भीती सुरक्षा यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे. नॅशनल पार्टीच्या एका वरिष्ठ नेत्यानं सांगितले की, कुलगाव, रडवानी, खुवानी, कुइमोह, हवाडा आणि हाजी दुमहालपोरामधील गरिब कुटुंबातील मुलांना हिजबुल मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेत सहभागी करुन घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 
 
तर दुसरीकडे,  हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचा दहशतवादी बुरहानच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल बर्मिंगहॅम शहरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारताने यावर नाराजी व्यक्त करुन त्यास तीव्र विरोध केला. त्यामुळे या कार्यक्रमाची परवानगी आता रद्द करण्यात आली आहे.
 
बुरहान वानीला भारतीय सुरक्षा दलांनी गेल्या वर्षी 8 जुलै रोजी कंठस्नान घातले होते. त्याच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल बर्मिंगहॅममध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे त्यास बुरहान वानी डे असे नावही देण्यात आले होते. मात्र भारत सरकारने त्यास कडाडून विरोध केला आहे. भारताप्रमाणे इंग्लंडलाही दहशतवादाची झळ वारंवार बसली आहे. तीन दशकांहून अधिक काळ आयरिश रिपब्लिकन आर्मीने (आयआरए) इंग्लंडमध्ये विविध भागांमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणले होते. 1974 साली आयआरएने केलेल्या बॉम्बस्फोटांमध्ये बर्मिंगहॅममध्ये 21 जणांचे प्राण गेले होते. बर्मिंगहॅम पब बॉम्बिंग नावाने ही घटना ओळखली जाते. 1996 साली आयआरएने 1500 किलो स्फोटकांसह मॅंचेस्टरमध्ये केलेल्या स्फोटामध्ये 200 लोक गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर वर्षभरात पुन्हा मॅंचेस्टरमध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये 23 व्यक्तींचे प्राण गेले होते तर 259 लोक जखमी झाले होते.
 
2005 साली अल कायदाने केलेल्या स्फोटामध्ये 52 लोक ठार झाले होते. दहशतवादी हल्ल्यांची ही मालिका या 2017 पर्यंतदेखील सुरूच आहे. यावर्षी ब्रिटीश संसदेजवळ खालिद मसूद या कारचालकाने पादचाऱ्यांवर गाडी चढवून 4 जणांना ठार केले होते आणि 50 जणांना जखमी केले. अशी पार्श्वभूमी असतानाही बर्मिंगहॅममध्ये "बुरहान वानी डे" ला परवानगी देण्यात आली. बर्मिंगहॅमच्या व्हिक्टोरिया स्क्वेअर येथे रॅलीही काढण्यात आली होती. बुरहानच्या चित्रांची पोस्टर्स आणि संदेश सोशल मीडियावरुन व्हायरल करण्यात आले होते." जे आमचं आहे ते सर्व शक्तीने आम्ही मिळवूच. काश्मीर स्वतंत्र करुन तेथे आमचा झेंडा फडकवूच" असा संदेश व्हायरल केला गेला होता. भारताचे इंग्लंडमधील उपउच्चायुक्त दिनेश पटनाईक यांनी या कार्यक्रमाच्या परवानगी विरोधात फॉरेन अॅंड कॉमनवेल्थ ऑफिसमध्ये तक्रार केली. भारतविरोधी संघटनांना लोकशाहीच्या नावाखाली येथे वाढू देणे कधीही योग्य नाही असे त्यांनी त्यामध्ये म्हटले आहे.