श्रीनगर - जम्मू-काश्मीर प्रशासनाकडून तब्बल 5 महिन्यांनी जम्मू विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये ‘2-जी’ मोबाईल इंटरनेट सेवा बहाल करण्यात आली आहे. मात्र ही सुविधा केवळ पोस्टपेड मोबाईलसाठीच उपलब्ध असणार आहे. तसेच हॉटेल, रुग्णालय, ट्रॅव्हल एजन्सीशी संबंधीत ब्रॉडबॅण्ड सेवा देखील सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी (14 जानेवारी) प्रशासनाने 15 जानेवारीपासून हे लागू करण्याचा आदेश दिला होता. ही सुविधा जम्मू, सांबा, उधमपूर, कठुआ, आणि रियासी या जिल्ह्यांमध्ये उपलब्ध असणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 15 जानेवारीपासून सात दिवसांपर्यंत जम्मू विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये ‘2-जी’ मोबाईल इंटरनेट सुविधा देण्यात येणार आहे. गृहविभागाकडून देण्यात आलेल्या आदेशामध्ये काश्मीर विभागात अतिरिक्त 400 इंटरनेट कियोस्कची स्थापना केली जातील. इंटरनेट सेवा देणारे आवश्यक सेवा देणाऱ्या सर्व संस्था, रुग्णालय, बँकाबरोबच शासकीय कार्यालयात ब्रॉडबॅण्ड सुविधा देण्यात येईल. पर्यटकांच्या सुविधेच्या दृष्टीने ब्रॉडबॅण्ड इंटरनेट हॉटेल आणि यात्रा कंपन्यांना पुरवले जाणार आहेत.
जम्मू परिसरातील सांबा, कठुआ, उधमपूर आणि रियासीमध्ये ई-बँकींगसह सुरक्षित वेबसाईट पाहण्यासाठी पोस्टपेड मोबाईलवर 2जी मोबाईल इंटरनेटला परवानगी दिली आहे. अन्य जिल्ह्यांमध्ये मोबाईल सेवा अद्याप बंद असल्याचं आदेशात म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने कायदा सुव्यवस्था व सद्यस्थितीची पडताळणी करून जम्मू विभागात मोबाईल इंटरनेट सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सात दिवसांच्या पाहणीनंतर या सेवेचा कालावधी वाढवला जाऊ शकतो. 5 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीर खोऱ्यात लँडलाईन, इंटरनेट व एसएमएस सेवा बंद करण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या
CAA: मोदींच्या गुजरातमध्ये विरोधाचे पतंग गुल; उडवण्यापूर्वीच पोलिसांकडून जप्त
अर्जुनाच्या बाणांमध्ये होती अणुशक्ती! बंगालच्या राज्यपालांचा दावा
सीएएवर मलेशियाच्या पंतप्रधानांची आगपाखड, भारत असा शिकवणार धडा
शिवसेनेने केली भाजपसोबत हातमिळवणी; महाविकास आघाडीला फासला हरताळ