08 Oct, 24 08:33 PM
काँग्रेसवाले खोटं बोलले, पण जनतेने एक ऐकलं नाही: जेपी नड्डा
हरियाणात काँग्रेस सतत खोटे बोलत होते, पण जनतेने त्यांचे ऐकले नाही. पीएम मोदींच्या अथक प्रयत्नांमुळे हरियाणा आज भाजपचा बालेकिल्ला बनला आहे. हरियाणातील आमचा विजय ऐतिहासिक आहे. हरियाणातील जनतेने पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे.
08 Oct, 24 07:05 PM
काँग्रेसचे 'खटाखट-खटाखट' मॉडेल फेल; अनुराग ठाकूर यांची बोचरी टीका
हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालांबद्दल भाजप खासदार अनुराग ठाकूर म्हणाले, "जनतेचे खूप खूप आभार, कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले. मतदानाच्या दिवशी सर्वजण भाजपच्या पाठीशी उभे राहिले. काँग्रेसचे खटाखट मॉडेल अपयशी ठरले. हरियाणातील जनतेचे खूप खूप आभार आणि हरियाणातील भाजप कार्यकर्त्यांचे खूप खूप अभिनंदन...आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सतत पुढे जात आहोत.
08 Oct, 24 07:02 PM
उचाना जागेवर भाजपचा निसटचा विजय; अवघ्या ३२ मतांनी काँग्रेसच्या ब्रिजेंद्र सिंह यांचा पराभव
उचाना विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार देवेंद्र अत्री अत्यंत कमी फरकाने विजयी झाले आहेत. देवेंद्र यांना ४२८३५ मते मिळाली, तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे बृजेंद्र सिंह यांना ४२८०३ मते मिळाली. म्हणजेच, त्यांचा फक्त ३२ मतांनी विजय झाला.
08 Oct, 24 06:46 PM
भाजपाच्या मुख्यालयात आनंदोत्सव, जल्लोष अन् फटाक्यांची आतषबाजी
हरयाणामध्ये भाजपाला मोठा धक्का बसेल असे राजकीय पंडित सांगत होते. त्यांची भविष्यवाणी खोटी ठरवत विधानसभा निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारली. या विजयानंतर भाजपच्या दिल्ली येथील मुख्यालयात जल्लोषाचे वातावरण आहे. पंतप्रधान मोदी संध्याकाळी येथे कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी येऊ शकतात.
08 Oct, 24 06:43 PM
परदेशात मायदेशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला: अमित शाह
आपल्या व्होट बँकेसाठी परदेशात जाऊन देशाचा अपमान करणाऱ्यांना हरयाणाच्या जनतेने चांगलाच धडा शिकवला आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. भाजपाला सलग तिसऱ्यांदा राज्याची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी हरयाणाच्या जनतेचे मनापासून आभारही मानले आहेत.
08 Oct, 24 06:36 PM
हरयाणा: आतापर्यंत ४२ जागांवर भाजपा, ३५ जागांवर काँग्रेस विजयी
निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार सायंकाळी ६ वाजेपर्यंत, हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाने ४२ जागांवर विजय मिळवला आणि ६ जागांवर आघाडी घेतली. तर काँग्रेसने ३५ जागा जिंकल्या असून २ जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत.
जाणून घ्या ताजी आकडेवारी
08 Oct, 24 05:01 PM
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचे सर्व निकाल हाती
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचे सर्व निकाल हाती, पाहा कुठल्या पक्षाला किती जागा...
नॅशनल कॉन्फरन्स- ४२
भाजपा- २९
कांग्रेस- ०६
पीडीपी- ०३
जम्मू-कश्मीर पीपुल्स कॉन्फरन्स- ०१
आम आदमी पार्टी- ०१
सीपीआई(एम)- ०१
अपक्ष- ०७
08 Oct, 24 03:24 PM
भाजपाच्या दमदार विजयानंतर हरयाणाचे मुख्यमंत्री सैनी यांनी PM मोदींना दिले श्रेय
हरयाणामध्ये भाजपाचा विजय जवळपास निश्चित आहे. आजच्या कलानंतर हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी पंतप्रधान मोदींना विजयाचे श्रेय दिले. ते म्हणाले, "मला लाडवा आणि हरयाणातील २.८० कोटी जनतेचे आभार मानायचे आहेत. या विजयाचे श्रेय पंतप्रधान मोदींना जाते. हरयाणातील जनतेने पंतप्रधान मोदींच्या धोरणांवर शिक्कामोर्तब केले आहे."
08 Oct, 24 02:45 PM
जनतेने आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त मतांनी जिंकवले- ओमर अब्दुल्ला
JKNC चे उपाध्यक्ष आणि बडगाममधील विजयी उमेदवार ओमर अब्दुल्ला यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "संपूर्ण निकाल अद्याप आलेला नाही, त्यानंतर आम्ही याबद्दल बोलू. नॅशनल कॉन्फरन्सला ज्या प्रकारे विजय मिळाला आहे, त्यासाठी आम्ही मतदारांचे आभारी आहोत. लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळवण्यात आम्ही यशस्वी ठरलो याचा आनंद आहे. आमची वचने आम्ही पाळू," असे ते म्हणाले.
08 Oct, 24 02:39 PM
उधमपूर पूर्व मधून भाजपाचे रणवीर सिंह पठानिया विजयी
उधमपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार रणवीर सिंग पठानिया विजयी झाले आहेत. रणवीर यांना ३२,९९६ मते मिळाली. त्यांनी २,३४९ मतांनी विजय मिळवला. अपक्ष उमेदवार पवन खजुरिया दुसऱ्या स्थानावर (३०,६४७) राहिले. नॅशनल पँथर्स पार्टीचे बलवान सिंग तिसऱ्या क्रमांकावर आणि एनसीचे उमेदवार सुनील वर्मा चौथ्या स्थानावर राहिले.
08 Oct, 24 02:09 PM
ओमर अब्दुल्ला विजयी
ओमर अब्दुल्ला संपूर्ण कार्यकाळासाठी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री असतील, फारुख अब्दुल्लांची घोषणा
08 Oct, 24 01:57 PM
विनेश फोगाट जिंकली
विनेश फोगाटने जुलानाची दंगल जिंकली आहे. त्यांना 65080 मते मिळाली तर भाजपला 59065 मते मिळाली.
08 Oct, 24 01:44 PM
वैष्णो देवी मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार विजयी
जम्मू काश्मीर : वैष्णो देवी मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार विजयी. १९०० मतांनी बलदेव शर्मांचा विजय.
08 Oct, 24 01:34 PM
हरियाणामधून पहिला निकाल आला; भाजपाच्या वादळातही काँग्रेस उमेदवार ४६ हजार मतांनी जिंकला
हरियाणामधून पहिला निकाल आला; भाजपाच्या वादळातही काँग्रेस उमेदवार ४६ हजार मतांनी जिंकला
08 Oct, 24 01:33 PM
जम्मू काश्मीरमध्ये रोवला आपचा झेंडा
आम आदमी पार्टीने जम्मू-काश्मीरमध्ये डोडा मतदारसंघात आश्चर्यकारक विजय मिळविला आहे. मेहरा 4500 मतांनी विजयी.
08 Oct, 24 12:51 PM
विनेश फोगाटने बाजी पलटवली; आता ६००० मतांनी आघाडीवर
विनेश फोगट या सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडीवर होत्या. परंतू, नंतर त्या पिछाडीवर पडल्या होत्या. आता पुन्हा त्यांनी ६ हजार मतांनी आघाडी घेतली असून त्या मदमोजणी केंद्रावर दाखल झाल्या आहेत. भाजपचे उमेदवार योगेश बैरागी दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
08 Oct, 24 12:28 PM
काँग्रेसने पहाटेच खोट्याचे दुकान उघडले होते. - विज
काँग्रेसने पहाटेच खोट्याचे दुकान उघडले होते. तेथून नकली पाणी, नकली बिस्किटे, नकली जिलेबी येत होत्या. आम्ही विचार केला होता तसा निकाल येत आहे. एखाद्याला बनावट शूज घालायला दिले तर तो घरी जाईपर्यंत ते फाटतील, तसे सकाळचा बूट फाटला आहे. - अनिल विज.
08 Oct, 24 12:09 PM
मची मतांची टक्केवारी भाजपपेक्षा खूप जास्त - श्रीनाते, काँग्रेस.
मी EC वेबसाइट तपासत आहे. डेटा बदलत नाहीये. आमची मतांची टक्केवारी भाजपपेक्षा खूप जास्त आहे. आम्हाला हरियाणातून चांगली बातमी मिळेल - सुप्रिया श्रीनाते, काँग्रेस.
08 Oct, 24 12:05 PM
काँग्रेसच्या उमेदवार विनेश फोगाट मतमोजणी केंद्रावर दाखल
08 Oct, 24 11:56 AM
जेपी नड्डा यांनी भाजपच्या सरचिटणीसांची बैठक बोलावली.
दिल्ली: जेपी नड्डा यांनी भाजपच्या सरचिटणीसांची बैठक बोलावली. हरयाणात भाजपाचे उमेदवार पुढे, तर जम्मू काश्मीरमध्ये पिछाडीवर.
08 Oct, 24 11:52 AM
हरियाणात काँग्रेसचा वनवास कायम राहणार - भाजप
हरियाणात काँग्रेसचा वनवास कायम राहणार: निकालांदरम्यान भाजपचा मोठा दावा
08 Oct, 24 11:24 AM
काश्मीर खोऱ्याने काँग्रेसला, तर जम्मूने भाजपला हात दिला...
जम्मूमध्ये भाजपला मोठा पाठिंबा मिळाला आहे. ११ पैकी १० जागांचे कल हाती आले आहेत.
अखनूरमध्ये भाजपचे उमेदवार मोहन लाल सुमारे चार हजार मतांनी पुढे आहेत.
बाहूमधून भाजपचे उमेदवार विक्रम रंधावा यांनी सुमारे एक हजारांची आघाडी घेतली.
बिश्नाहमधून भाजपचे उमेदवार राजीव कुमार सुमारे दोन हजार मतांनी पुढे आहेत.
-छांबमधून अपक्ष उमेदवार सतीश शर्मा यांनी सुमारे तीन हजार मतांनी आघाडी घेतली.
जम्मू पूर्वमधून भाजपचे उमेदवार युधवीर सेठी यांनी सुमारे पाच हजारांची आघाडी घेतली.
जम्मू उत्तरमधून भाजपचे उमेदवार शाम शर्मा दहा हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत.
जम्मू पश्चिममधून भाजप उमेदवार 11 हजार मतांनी पुढे आहे.
मढ येथील भाजप उमेदवार सुमारे आठ हजार मतांनी पुढे आहे.
नगरोटा येथील भाजप उमेदवार सुमारे 6600 मतांनी पुढे आहे.
जम्मू दक्षिण-आरएसपुरा येथून भाजपचे उमेदवार नरेंद्र सिंह यांनी सुमारे तीन हजार मतांची आघाडी घेतली.
सुचेतगडमधून भाजपचे उमेदवार गरूराम यांनी आठ हजार मतांनी आघाडी घेतली.
08 Oct, 24 10:51 AM
हरियाणाच्या हायप्रोफाईल जागांवर कोण पुढे कोण मागे...
जुलानामधून विनेश फोगट पिछाडीवर
सिरसा येथून गोपाल कांडा पिछाडीवर
दुष्यंत चौटाला उचाना कलामधून चौथ्या स्थानावर
भूपेंद्र सिंह हुड्डा 11000 मतांनी पुढे आहेत
अंबाला कँटमधून अनिल विज मागे आहेत.
08 Oct, 24 10:44 AM
निवड़णूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भााजपा ४८, काँग्रेस ३४ वर
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार सुरुवातीच्या आघाडीनंतर काँग्रेस हरियाणा विधानसभा निवडणुकीत पिछाडीवर पडल्याचे दिसत आहे. यापूर्वी 65 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर असलेल्या काँग्रेसची संख्या 34 पर्यंत खाली आली आहे.
08 Oct, 24 10:34 AM
हरियाणात काँग्रेसचे सरकार स्थापन होणार : हुड्डा
हरयाणात काँग्रेस पक्ष सरकार स्थापन करणार आहे. हरियाणात काँग्रेसचा विजय होईल, असे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा म्हणाले.
08 Oct, 24 09:54 AM
हरयाणात बाजी पालटली
काँग्रेस ३९
भाजप ४७
INLD+ 2
जेजेपी+ 0
इतर
2
08 Oct, 24 09:31 AM
हरियाणाचे अधिकृत कल आले समोर
काँग्रेस १८ जगांवर आघाडीवर
भाजपा १४ जगांवर आघाडीवर
१ जागेवर INLD
१ जागेवर अपक्ष उमेदवार आगाडीवर
08 Oct, 24 09:20 AM
जम्मू काश्मीर -४५ विधानसभा जागांसाठी निवडणूक आयोगाचे अधिकृत कल
जम्मू काश्मीर : ९० पैकी ४५ विधानसभा जागांसाठी निवडणूक आयोगाचे अधिकृत कल
JKNC २१ जागांवर आघाडीवर आहे
भाजपा १७ जागांवर आघाडी
काँग्रेस ४ जागांवर
पीडीपी २
08 Oct, 24 09:16 AM
नॅशनल कॉन्फरन्स युती 24 जागांवर आघाडीवर
जम्मू काश्मीर : नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडी २४ जागांवर आघाडीवर असून भाजप १६ जागांवर आघाडीवर आहे. पीडीपी तीन जागांवर तर अपक्ष दोन जागांवर आघाडीवर आहेत. ओमर अब्दुल्ला गांदरबलमधून आघाडीवर आहेत. तर अनंतनागमधून भाजपचे उमेदवार रफिक वाणी आघाडीवर आहेत.
08 Oct, 24 09:02 AM
हरियाणा : सुरुवातीच्या कलांत काँग्रेस ६२ जागांवर आघाडीवर
हरियाणामध्ये सत्तांतर होताना दिसत आहे. सुरुवातीच्या कलांत काँग्रेस 62 जागांवर आघाडीवर असून भाजप १४ जागांवर आघाडीवर आहे. तर आयएनएलडी व इतर प्रत्येकी तीन जागांवर आघाडीवर आहेत. चौटाला यांची जेजेपी एका जागेवर पुढे आहे.
08 Oct, 24 08:51 AM
जम्मू काश्मीर निवडणूक निकाल, सुरुवातीचे कल
काँग्रेस आघाडी 35
पीडीपी 3
भाजप 16
इतर 3
08 Oct, 24 08:49 AM
हरियाणात काँग्रेसची जोरदार मुसंडी; भाजपा मागे पडली
हरियाणा निवडणूक निकाल, सुरुवातीचे कल
काँग्रेस - ५१
भाजप १५
INLD+ 3
जेजेपी+ १
इतर १
08 Oct, 24 08:43 AM
अंबाला कँटमधून अनिल विज पिछाडीवर
अनिल विज हरियाणाच्या हॉट सीट अंबाला कँटमधून पिछाडीवर आहेत. येथे अपक्ष उमेदवार चित्रा सरवरा आघाडीवर आहेत. विज हे भाजपचे दिग्गज नेते आहेत.
08 Oct, 24 08:40 AM
विनेश फोगट आघाडीवर
हरियाणातील हॉट सीट बनलेल्या जुलाना येथून काँग्रेस उमेदवार आणि ऑलिम्पियन विनेश फोगट आघाडीवर आहे. भाजपने येथून कॅप्टन योगेश बैरागी यांना उमेदवारी दिली होती. तर आम आदमी पक्षाने हरियाणाची पहिली महिला कुस्तीपटू कविता दलाल यांना तिकीट दिले होते.
08 Oct, 24 08:38 AM
हरियाणात सुरुवातीच्या कलानुसार काँग्रेस २५, भाजप १९
CONG+ 25
भाजप 19
INLD+ 2
जेजेपी+ 2
इतर 5
08 Oct, 24 08:38 AM
हरियाणात सुरुवातीच्या मतमोजणीत काँग३
CONG+ 25
भाजप 19
INLD+ 2
जेजेपी+ 2
इतर 5
08 Oct, 24 08:11 AM
जम्मू-काश्मीर विधानसभेत एकूण ९५ आमदार असणार...
जम्मू-काश्मीर विधानसभेत एकूण 90 सदस्य निवडले जाणार आहेत. तर 5 आमदारांना उपराज्यपाल नामनिर्देशित करतील. पाच आमदारांना उमेदवारी दिल्यास ही संख्या 95 पर्यंत वाढेल.
08 Oct, 24 08:00 AM
८.३० वाजल्यापासून ईव्हीएममधील मतांची मोजणी केली जाणार. - श्रीनगर उप जिल्हाधिकारी
सकाळी ८ वाजल्यापासून पोस्टल मतांची मोजणी, ८.३० वाजल्यापासून ईव्हीएममधील मतांची मोजणी केली जाणार. - श्रीनगर उप जिल्हाधिकारी
08 Oct, 24 07:56 AM
...तर जबाबदारी माझी; हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी निकालापूर्वी केले स्पष्ट
जर सत्ता स्थापन्याएवढ्या जागा आल्या नाहीत तर जबाबदारी माझी; हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी निकालापूर्वी केले स्पष्ट
08 Oct, 24 07:48 AM
मतदानापूर्वी उमर अब्दुल्लांचे ट्विट
माझ्या सर्व सहकाऱ्यांना शुभेच्छा. आम्ही चांगली लढत दिली, असे नॅकाँचे उपाध्यक्ष आणि गांदरबल आणि बडगाममधील पक्षाचे उमेदवार उमर अब्दुल्ला यांनी ट्विट केले.
08 Oct, 24 07:46 AM
भाजपने जम्मू-काश्मीरच्या लोकांना दगडफेकीपासून दूर नेले - गुप्ता
आज होत असलेल्या जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते कविंदर गुप्ता म्हणाले की, भाजपने जम्मू-काश्मीरच्या लोकांना दगडफेकीपासून दूर नेले आहे. त्यांची सुटका करण्यात आली आहे. एक्झिट पोलबाबत ते म्हणाले की, एक्झिट पोलचे आकडे आणि आमचे आकडे यात फरक आहे. आम्ही लोकांमध्ये राहिलो. निकाल भाजपच्या बाजूने लागेल.
08 Oct, 24 07:42 AM
मुख्यमंत्री सैनी समाजाच्या धर्मशाळेत पोहोचले
हरियाणाचे मुख्यमंत्री आणि लाडवा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नायब सिंह सैनी कुरुक्षेत्रातील सैनी समाज धर्मशाळेत पोहोचले. थोड्याच वेळात मतमोजणी सुरू होणार आहे.