जम्मू - कलम ३७० कधीही परत लागू हाेणार नाही, यासह ५ लाख राेजगार, उज्ज्वला याेजनेच्या लाभार्थ्यांना दाेन माेफत गॅस सिलिंडर, १०वीच्या विद्यार्थ्यांना टॅब्लेट आणि लॅपटाॅप इत्यादी आश्वासने भाजपने जम्मू-काश्मीरच्या जनतेला दिली आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे संकल्पपत्र प्रसिद्ध केले. अमित शाह यांनी यावेळी सांगितले की, गेल्या १० वर्षांत जम्मू-काश्मीरचे सुवर्ण युग पाहिले. शांतता, प्रगती आणि विकास राज्यात दिसून आला.
शाह यांचे काॅंग्रेसला प्रश्नअमित शाह यांनी काॅंग्रेसला दाेन प्रश्न विचारले. नॅशनल काॅन्फरन्सच्या अजेंड्यात कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा उल्लेख आहे. त्यावर काॅंग्रेसची सहमती आहे का? दुसरा प्रश्न म्हणजे, देशाचे दाेन राष्ट्रध्वज असू शकतात का?
दहशतवाद पूर्णपणे संपविणारजम्मू-काश्मीरमधून आम्ही दहशतवाद पूर्णपणे संपवू, असे अमित शाह यांनी सांगितले. राज्यात दहशतवाद फाेफावण्यासाठी सामील लाेकांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी श्वेतपत्र जारी करू, असे शाह म्हणाले.
इतर आश्वासने काय?- श्रीनगर येथील दल सराेवरला जागतिक दर्जाचे पर्यटन क्षेत्र बनविण्यात येईल.- डाेडा, किश्तवाड, रामबन, राजाैरी, पुंछ, कठुआ इत्यादी क्षेत्रातील उंचावरील भाग पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित केला जाईल.- गुलमर्ग आणि पहलगामला आधुनिक पर्यटन शहर बनविण्यात येईल.- वीज आणि पायाच्या थकित बिलांची समस्या साेडविण्यासाठी याेजना आणू.
महिलांसाठी : उज्ज्वल याेजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी २ गॅस सिलिंडर माेफत. माता सन्मान याेजनेतून प्रत्येक कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ महिलेला १८ हजार रुपये दरमहा आर्थिक मदत मिळेल. महिला स्वयंसहायता गटांचे कर्ज माफ करण्यात येतील.
प्रमुख आश्वासने विद्यार्थ्यांसाठी...- राज्यात ५ लाख जणांना राेजगार देण्यात येईल. - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दरवर्षी ३ हजार रुपये प्रवास भत्ता देण्यात येईल.- जेकेपीएससी आणि यूपीएससीची तयारी करण्यासाठी २ वर्षांसाठी १० हजार रुपये काेचिंग शुल्कासाठी मदत.
शेतकऱ्यांसाठीपंतप्रधान सन्मान निधीतून १० हजार रुपये राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात येतील. सध्याच्या ६ हजार रुपयांमध्ये आणखी ४ हजार रुपये जाेडण्यात येतील.शेतीच्या कामांसाठी वीजदरांमध्ये ५० टक्के कपात केली जाईल.अटल आवास याेजनेंतर्गत भूमिहीन लाेकांना ५ मरला म्हणजे सुमारे १,३६१ चाैरस फूट जमीन देऊ.