Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 07:23 PM2024-10-05T19:23:21+5:302024-10-05T19:28:45+5:30
Jammu Kashmir Assembly Election 2024, Exit Poll: कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबत देशभरात उत्सुकता आहे. दरम्यान, तीन टप्प्यात झालेल्या जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचं मतदान आटोपल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत.
कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबत देशभरात उत्सुकता आहे. दरम्यान, तीन टप्प्यात झालेल्या जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचं मतदान आटोपल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. इंडिया टुडे- सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल काँफ्रन्स यांची इंडिया आघाडी सर्वात मोठी आघाडी ठरण्याची शक्यता आहे. तर भाजपाला दुसऱ्या क्रमांकावर राहावे लागणार आहे.
इंडिया टुडे आणि सी-वोटरच्या आकडेवारीनुसार विधानसभेच्या ९० जागा असलेल्या जम्मू-काश्मीरच्या विधानसभेमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स-काँग्रेस आघाडीला ४० ते ४८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर भाजपाला २७ ते ३२ जागांवर समाधान मानावे लागणार आहे. त्याशिवाय पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाला ६ ते १२ तर इतर आणि अपक्षांना ६ ते ११ जागा मिळण्याची शक्यता आहे.
या एक्झिट पोलच्या सविस्तर आकडेवारीनुसार जम्मू विभागामध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. जम्मूमधील विधानसभेच्या ४३ जागांपैकी भाजपाला २७ ते ३१, काँग्रेस-नॅशनल कॉन्फ्रन्स आघाडीला ११ ते १५, पीडीपीला ० ते २ आणि इतरांना ० ते १ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काश्मीर विभागातील ४७ जागांपैकी काँग्रेस-नॅशनल कॉन्फ्रन्स आघाडीला २९ ते ३३, तर पीडीपीला ६ ते १० आणि इतरांना ६ ते १० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काश्मिरमध्ये भाजपाला ० ते १ जागा मिळू शकते, असा अंदाज या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे.