पुलवामा/बडगाम:जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. बडगाम जिल्ह्यातील वॉटरहोल भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार झाले. त्यापैकी एकाने काश्मिरी पंडित राहुल भट यांची हत्या केली होती. काश्मीरचे एडीजीपी विजय कुमार यांनी याबाबत माहिती दिली.
त्यांनी सांगितले की, या परिसरात लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरले होते. त्यातील एक लतीफ रादर नावाचा दहशतवादी काश्मिरी पंडित राहुल भट आणि अमरीन भट यांच्यासह अनेक नागरिकांच्या हत्येत सामील होता. सध्या परिसरात शोध मोहीम सुरू आहे. दुसरीकडे, सुरक्षा दलांनी पुलवामामध्ये दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला आहे. येथे मोठ्या प्रमाणात आयईडी (इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस) जप्त करण्यात आले असून, या पोलीस दोन्ही घटनांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करत आहेत.
पुलवामामध्ये 25-30 किलो IED जप्तएडीजीपी विजय कुमार यांनी सांगितले की, पोलिस आणि सुरक्षा दलांच्या संयुक्त कारवाईदरम्यान, पुलवामामधील गोलाकार मार्गावरील तहब क्रॉसिंगजवळ 25 ते 30 किलो आयईडी जप्त करण्यात आले आहे. दहशतवादी या परिसरात काही मोठी घटना घडवणार असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी हे आयईडी निकामी केले असून, परिसरात शोध मोहिम राबवली जात आहे.
आतापर्यंत 139 दहशतवाद्यांचा खात्मागेल्या काही महिन्यांपासून सुरक्षा दलांनी काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन ऑलआउट सुरू केले आहे. सरकारी आकडेवारीनुसार या वर्षात आतापर्यंत 139 दहशतवादी मारले गेले आहेत. यापैकी 32 हून अधिक परदेशी आहेत. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात 6 दहशतवादी मारले गेले. त्यात जैश-ए-मोहम्मदचे दोन आणि लष्करचे चार दहशतवादी होते.