शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
2
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
3
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
4
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
5
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
6
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
7
चंद्रशेखर यांच्या पक्षाला हरयाणात मोठा झटका; अनेक उमेदवारांना 500 पेक्षाही कमी मते...
8
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
9
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
10
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
11
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
12
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
13
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
14
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
15
'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट
16
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
17
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
18
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
19
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
20
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान

J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 7:38 PM

दहशतवादी अफजल गुरुच्या भावाला दणका, मिळाली फक्त 129 मते; नोटापेक्षाही कमी

Jammu-Kashmir Election 2024 : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल आले आहेत. दहा वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकीत मतदारांनी फुटीरतावादी उमेदवारांना पूर्णपणे नाकारले आहे. इंजीनिअर राशीद याच्या अवामी इत्तेहाद पार्टी (एआयपी) आणि जमात-ए-इस्लामी सारख्या पक्षांना मतदारांनी मोठा दणका दिला. या पक्षांचे बहुतांश उमेदवार निवडणुकीत आपली अनामत रक्कमही वाचवू शकले नाहीत. यावरुनच मतदारांनी त्यांना पूर्णपणे नाकारल्याचे स्पष्ट होते.

मात्र, इंजिनीअर राशीद यांचे बंधू खुर्शीद अहमद शेख, लंगेट मतदारसंघातून विजयी झाले. हा यंदाच्या निवडणुकीतील एकमेव मोठा विजय म्हणता येईल. याशिवाय, कुलगाममधून जमात-ए-इस्लामी समर्थित उमेदवार सय्यर अहमद रेशी यांनीदेखील विजय मिळवला. या दोघांशिवाय इतर सर्व उमेदवारांना जनतेचा पाठिंबा मिळाला नाही.

अफझल गुरुच्या भावाचा दारुण पराभवभारताने फासावर चढवलेला दहशतवादी अफझल गुरुचा भाऊ एजाज अहमद गुरू याचाही सोपोरमधून मोठा पराभव झाला. एजाजला फक्त 129 मते मिळाली. या जागेवरुन 'नोटा'ला त्यांच्यापेक्षा 341 मते जास्त मिळाली.

अवामी इत्तेहाद पक्षाची वाईट अवस्था

इंजीनिअर रशीद यांच्या अवामी इत्तेहाद पक्षाने (एआयपी) 44 उमेदवार उभे केले होते, परंतु त्यापैकी अनेकांना त्यांची अनामत रक्कमही वाचवता आली नाही. एआयपीचे प्रवक्ते फिरदौस बाबा आणि व्यापारी शेख आशिक हुसेन यांसारखे प्रमुख उमेदवारही पराभूत झाले. शेख आशिक यांना केवळ 963 मते मिळाली, तर 'नोटा'ला 1,713 मते मिळाली. यावरून जनतेने या पक्षाला पूर्णपणे नाकारल्याचे दिसून येते.

फुटीरतावादी राजकारणाला धक्काकाश्मीरमधील जनता आता फुटीरतावादी राजकारणाला नाकारत असल्याचे या निवडणुकीच्या निकालांनी स्पष्ट केले आहे. हे निवडणूक निकाल म्हणजे काश्मीरच्या राजकीय दिशेने मोठ्या बदलाचे संकेत असल्याचे विश्लेषकांचे मत आहे. जनतेचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळालेली नॅशनल कॉन्फरन्स आपल्या आश्वासनांची पूर्तता कशी करते, याकडे आता सर्वांचे लक्ष असेल. 

निकालजम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. निकालात NC-काँग्रेसचा विजय झाला असून या आघाडीने सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेला बहुमताचा टप्पा ओलांडला आहे. निवडणुकीत एनसी-काँग्रेसला 49, भाजपला 29, पीडीपीला 3 आणि इतरांना 9 जागा मिळाल्या. 

टॅग्स :jammu and kashmir assembly election 2024जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसBJPभाजपा