Jammu Kashmir Election 2024 : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी राज्यात जोरदार प्रचार करत आहेत. आज, बुधवारी त्यांनी जम्मू जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स (NC) च्या उमेदवारांच्या समर्थनार्थ आयोजित निवडणूक रॅलीला संबोधित करताना, भाजपने अंमलबजावणी संचालनालय (ईडी), केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) आणि इन्कम टॅक्स (आयटी) सारख्या केंद्रीय एजन्सीचा वापर केल्याचा आरोप. यादरम्यान त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी काश्मिरी पंडितांना पीओके निर्वासित म्हटले.
भाषण करताना राहुल गांधी गोंधळले आणि त्यांनी काश्मिरी पंडितांना PoK निर्वासित म्हटले. मात्र, नंतर त्यांची चूक लक्षात आल्याने त्यांनी आपले विधान दुरुस्त केले. मात्र आता भाजप या वरुन काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न करत आहे.
काय म्हणाले राहुल?"निवडणुकीपूर्वी राज्याचा दर्जा बहाल व्हावा, अशी आमची इच्छा होती. जम्मू-काश्मीरच्या सर्व जनतेला राज्याचा दर्जा बहाल केल्यानंतर निवडणुका व्हाव्यात, असे वाटत होते. तसे झाले नाही. पण, निवडणूक झाल्यानंतर जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करावा लागेल. त्यांनी तसे केले नाही, तर केंद्रात आमचे सरकार स्थापन होताच आम्ही जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करू," असे राहुल म्हणाले. यादरम्यान राहुल यांची जीभ घसरली आणि ते म्हणाले की, "मनमोहन सिंग यांनी पीओकेमधून आलेल्या निर्वासितांना दिलेले वचन पूर्ण केले जाईल.ठ मात्र, नंतर त्याला आपली चूक लक्षात आली. त्यांनी लगेच चूक सुधारुन म्हटले, "माफ करा, मनमोहन सिंग यांनी काश्मिरी पंडितांना दिलेले वचन पूर्ण केले जाईल."
भाजपचा निशाणा आता भाजपने राहुल यांच्या स्लिप ऑफ द टंगचा मुद्दा बनवला आहे. "हा माणूस पीओकेमधील निर्वासित आणि काश्मिरी पंडित यांच्यात फरक करू शकत नाही आणि स्वतःला गांभीर्याने घेण्याची अपेक्षा करतो. प्रतिनिधित्व करण्यासाठी विरोधी पक्षाकडे नक्कीच कोणीतरी योग्य व्यक्ती असेल. या बालक बुद्धीला आमच्यावर लादल्याबद्दल काँग्रेसला लाज वाटली पाहिजे," अशी बोचरी टीका भाजपने केली आहे.