शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
2
केवायसी नाही म्हणून खाते फ्रीझ करू नका! आरबीआयने सर्व बँकांना खडसावले
3
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
4
गौतम अदानींना अमेरिकेत अटक होऊ शकते? जाणून घ्या दोषी आढळल्यास काय शिक्षा होईल
5
Employment: देशात १९ लाख तरुणांना महिनाभरात मिळाले जॉब; ९.३३ टक्के अधिक संधी
6
सांगोल्यात उच्चांकी मतदानामुळे निकालाची उत्कंठा वाढली; महिलांच्या मतदानाचा फायदा कोणाला?
7
दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी, विदर्भातील आमदारांना विशेष विमानाने सुरक्षित ठिकाणी हलवणार
8
माढ्याचा मतदानाचा वाढलेला टक्का कोणाकडे?; गावागावांतील नेतेमंडळी गुंतले आकडेमोडीमध्ये!
9
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
10
मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस
11
यशस्वीचा ऑस्ट्रेलियातील पहिला डाव अयशस्वी! टीम इंडियाचा युवा हिरो स्टार्कसमोर ठरला झिरो (VIDEO)
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
13
Zomato च्या झीरो सॅलरी ऑफरमध्ये नवा टर्न; बॅकफायरनंतर दीपिंदर गोयल यांनी आता काय केल?
14
जगभर : सौदी अरेबियाने १०१ परदेशी नागरिकांना लटकवलं फासावर!
15
याला म्हणतात संस्कार! कैलाश खेर समोर येताच गौरव मोरे पडला पाया, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव
16
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
17
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
18
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!
19
बीड जिल्ह्यात मतदान केंद्र फोडले; ४० जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
20
दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानमध्ये ५० ठार; मृतांमध्ये आठ महिला, पाच लहान मुलांचा समावेश

'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 1:51 PM

Jammu-Kashmir Election 2024 : 'कलम 370 हटवल्यामुळेच आज जम्मू-काश्मीरमध्ये आपला तिरंगा अभिमानाने फडकत आहे.'

Jammu-Kashmir Election 2024 : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापले आहे. एकीकडे काँग्रेस आणि नॅशनल कॉनफ्रन्स कलम 370 परत आणण्याचे आश्वासन देत आहेत, तर दुसरीकडे भाजप त्यांच्यावर याच मुद्द्यावरुन टीका करत आहेत. दरम्यान, आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit shah) यांनी नौशेरा येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

कलम 370 कधीच परतणार नाहीनॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसवर टीका करताना शाह म्हणतात, जम्मू-काश्मीरमध्ये या दोन पक्षांचे सरकार कधीच स्थापन होणार नाही. काँग्रेसने जम्मू-काश्मीरचे अधिकार हिरावून घेतले. काश्मीरच्या जनतेला 70 वर्षे त्यांचे हक्क मिळाले नाहीत. आज विरोधक कलम 370 परत आणण्याचे आश्वासन देत आहेत. पण, ही कलम हटवल्यामुळेच आज राज्यात आपला तिरंगा अभिमानाने फडकत आहे. तर, काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सला त्यांच्या वेगळा झेंडा परत आणायचा आहे. त्यांना सांगू इच्छितो की, आता काश्मीरमध्ये फक्त आपला लाडका तिरंगाच फडकेल. 

दहशतवाद संपल्यानंतरच पाकिस्तानशी चर्चा जम्मू-काश्मीरमधून दहशतवाद संपेपर्यंत आम्ही पाकिस्तानशी चर्चा करणार नाही. दहशतवाद संपल्यानंतरच पाकिस्तानशी चर्चा होईल. विरोधकांना नियंत्रण रेषेवरील व्यापार पूर्ववत करुन दगडफेक करणाऱ्यांना वाचवायचे आहे. पण, जम्मू-काश्मीरमध्ये कोणताही दहशतवादी मुक्तपणे फिरकणार नाही, याची मी खात्री देतो. राज्यात 30 वर्षांपासून दहशतवाद सुरू आहे. 30 वर्षांत 3 हजार दिवस कर्फ्यू होता, तर 40 हजार लोक मारले गेले. मोदीजी आले अन् आम्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला. आता गोळीला गोळीनेच उत्तर दिले जाईल. मोदी सरकारने दहशतवादाला जमिनीत गाडले, अशी गर्जना शाह यांनी यावेळी केली.

आरक्षण संपू देणार नाहीशाह पुढे म्हणाले की, काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने पहाडी, गुर्जर बकरवाल, दलित, वाल्मिकी आणि ओबीसी समाजाला दिलेल्या आरक्षणाचा पुनर्विचार करू, असे म्हटले आहे. राहुल गांधी अमेरिकेत जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा करतात. पण, आम्ही तुम्हाला आरक्षण काढू देणार नाही. काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीने 70 वर्षांपासून पहारी बांधवांचा आरक्षणाचा अधिकार हिरावून घेतला होता, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाJammu Kashmirजम्मू-काश्मीरElectionनिवडणूक 2024congressकाँग्रेसFarooq Abdullahफारुख अब्दुल्लाOmar Abdullahउमर अब्दुल्लाRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी