Shri Mata Vaishno Devi Seat Result: आज जम्मू-काश्मीर आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. हरयाणात भाजपने सलग तिसऱ्यांदा सत्ता काबीज केली. तर, जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला बहुमत मिळाले. मात्र, भाजपला राज्यात फारसा फरक पडलेला दिसत नाही. दहा वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपने 30 जागा जिंकल्या होत्या, तर यंदा 29 जागा जिंकल्या आहेत. यात राज्यातील नव्यानेच स्थापन झालेल्या श्रीमाता वैष्णोदेवी मतदारसंघाचा निकाल विशेष ठरला आहे. भाजप उमेदवार बलदेव राज शर्मा यांनी ही जागा 1995 मतांनी जिंकली आहे. या जागेवर अपक्ष उमेदवार जुगल किशोर दुसऱ्या क्रमांकावर राहिले.
ही जागा का महत्वाची?जम्मू-काश्मीरच्या श्री माता वैष्णोदेवी जागेवर भाजपचे उमेदवार बलदेव शर्मा यांना 18199 मते मिळाली, दुसऱ्या क्रमांकावर असलेले अपक्ष उमेदवार जुगल किशोर यांना 16204 आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसच्या भूपेंद्र सिंह यांना 5655 मते मिळाली. जम्मू-काश्मीरमधील श्री माता वैष्णोदेवीची जागा भाजपसाठी खूप महत्त्वाची होती. कारण लोकसभा निवडणूक 2024 मध्ये अयोध्या (फैजाबाद) आणि उत्तराखंडमधील बद्रीनाथ मतदारसंघ पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता. आता ही जागा जिंकून भाजपने मातेचा आशीर्वाद आपल्यावर असल्याचे सिद्ध केले आहे.
भाजपची रणनीती कामी आली; हरयाणात 'ऑल इज वेल', शेतकरी-जवान नाराज नाहीत..!
ही जागा जम्मू विभागातील रियासी जिल्ह्यात येते आणि या जागेवर 25 सप्टेंबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले होते. या जागेवर भाजपला सहज विजयाची अपेक्षा होती, कारण या ठिकाणी हिंदू धर्मातील पवित्र वैष्णौदेवी मंदिर आहे. यापूर्वी, लोकसभा निवडणुकीदरम्यान श्रीराम मंदिर असलेल्या अयोध्येत भाजपला अशाच निकालांची अपेक्षा होती, परंतु फैजाबादची जागा समाजवादी पक्षाच्या अवधेश प्रसाद यांनी जिंकली.
जम्मू-काश्मीरचे निकालजम्मू-काश्मीर निवडणुकीच्या निकालांबद्दल बोलायचे झाले तर, काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या आघाडीला 49 तर भाजपला 29 जागांवर विजय मिळाला आहे. दरम्यान, ओमर अब्दुल्ला जम्मू-काश्मीरचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. तर, भाजप राज्यातील प्रमुख विरोधीपक्ष असेल.
हरयाणात 'मोदी मॅजिक', राहुल गांधींनी जिथे सभा घेतल्या, त्या उमेदवारांचे काय झाले? पाहा...