जम्मू-काश्मीरच्या 'या' सात जागांवर काँग्रेस आणि एनसीत मैत्रीपूर्ण लढत; जाणून घ्या निकाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 06:42 PM2024-10-08T18:42:59+5:302024-10-08T18:43:36+5:30

जम्मू-काश्मीरमधील 7 जागांवर नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने आपापले उमेदवार उभे केले होते.

Jammu Kashmir Election Result 2024 : Friendly fight between Congress and NC on 'these' seven seats of Jammu and Kashmir; Know the result | जम्मू-काश्मीरच्या 'या' सात जागांवर काँग्रेस आणि एनसीत मैत्रीपूर्ण लढत; जाणून घ्या निकाल...

जम्मू-काश्मीरच्या 'या' सात जागांवर काँग्रेस आणि एनसीत मैत्रीपूर्ण लढत; जाणून घ्या निकाल...


Jammu Kashmir Election Result : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. निकालांमध्ये NC-काँग्रेस आघाडीचा विजय झाला असून, ओमर अब्दुल्ला राज्याचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. ही निवडणूक एनसी-काँग्रेसने एकत्र लढवली होती. काँग्रेसने 32 तर नॅशनल कॉन्फरन्सने 51 जागांवर आपले उमेदवार उतरवले होते. याशिवाय 7 जागांवर दोन्ही पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली. या सात जागांवर दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार उभे केले.

या सात जागा बनिहाल, दोडा, भदेरवाह, नगरोटा, सोपोर, बारामुल्ला आणि देवसर होत्या. या सातपैकी एनसीने 4, आपने 1 आणि भाजपने 2 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे या सात जागांचेच बोलायचे झाले तर काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही. चला जाणून घेऊया या सात जागांची स्थिती...

बनिहाल
बनिहाल मतदारसंघातून नॅशनल कॉन्फरन्सचे सज्जाद शाहीन विजयी झाले आहेत. त्यांना 33128 मते मिळाली. बनिहाल मतदारसंघातून काँग्रेसने विकार रसूल वाणी यांना तिकीट दिले होते. 2014 आणि 2008 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर ते दोनदा येथून विजयी झाले होते. 2022 ते 2024 या काळात त्यांनी जम्मू-काश्मीर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले.

दोडा
डोडा मतदारसंघात काँग्रेस किंवा एनसीने विजय मिळवला नाही. येथून आम आदमी पक्षाचे उमेदवार मेहराज मलिक विजयी झाले आहेत. त्यांना 23228 मते मिळाली. मेहराज मलिक हे जम्मू-काश्मीरमधील 'आप'चे पहिले आमदार आहेत. नॅशनल कॉन्फरन्सने डोडा मतदारसंघातून खालिद नजीब सुहरवर्दी यांना तिकीट दिले होते, तर काँग्रेसने शेख रियाझ यांना या जागेवरून उमेदवारी दिली होती.

भदरवाह
भदेरवाह मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे दलीप सिंह विजयी झाले आहेत. त्यांना 42128 मते मिळाली. जम्मूच्या या जागेची लोकसंख्येची रचना पाहिल्यास हिंदू आणि मुस्लिमांची लोकसंख्या जवळपास समान असल्याचे आहे. 2014 मध्ये भाजपने ही जागा जिंकली होती. भदेरवाह मतदारसंघातून नॅशनल कॉन्फरन्सने शेख मेहबूब इक्बाल यांना तिकीट दिले होते. तर काँग्रेसने नदीम शरीफ यांना उमेदवारी दिली होती. 

नगरोटा
नगरोटामधून भाजपचे देवेंद्रसिंह राणा विजयी झाले आहेत. नगरोटा ही जम्मू जिल्ह्याची हिंदू बहुसंख्य जागा आहे. 2014 मध्ये देवेंद्र सिंह राणा यांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या तिकिटावर ही जागा जिंकली होती. राणा यावेळी भाजपमधून लढले आणि विजयी झाले. या जागेवर नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली. नगरोटा मतदारसंघातून जोगिंदर सिंग हे नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार होते, तर काँग्रेसचे बलबीर सिंग रिंगणात होते.

सोपोर
सोपोरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार इर्शाद रसूल विजयी झाले आहेत. त्यांना 26975 मते मिळाली आहेत. त्यांच्यासमोर काँग्रेसचे अब्दुल रशीद दार होते.

बारामुल्ला
बारामुल्ला मतदारसंघातही काँग्रेस आणि एनसी या दोन्ही पक्षांचे उमेदवार आमनेसामने होते. बारामुल्ला मतदारसंघातून एनसीचे जावेद हसन बेग विजयी झाले आहेत. त्यांना 22523 मते मिळाली. त्यांच्यासमोर काँग्रेसकडून मीर इक्बाल अहमद रिंगणात होते. ते पाचव्या स्थानावर राहिले. काँग्रेसचे उमेदवार मीर इक्बाल यांना 4669 मते मिळाली.

देवसर
देवसर मतदारसंघातून एनसीचे पीरजादा फिरोज अहमद विजयी झाले आहेत. त्यांना 18230 मते मिळाली. त्यांच्यासमोर काँग्रेसचे अमान उल्लाह मंटू हे रिंगणात होते.  उमेदवाराला केवळ 4746 मते मिळाली

Web Title: Jammu Kashmir Election Result 2024 : Friendly fight between Congress and NC on 'these' seven seats of Jammu and Kashmir; Know the result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.