Jammu Kashmir: जम्मू काश्मीरच्या दक्षिण कुलगाम जिल्ह्यातील रेडवानी भागात सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली. या चकमकीत सुरक्षादलाने लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर बासित अहमद डारसह तीन दहशतवाद्यांना कंठस्तान घातले. इतर दहशतवाद्यांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत.
सविस्तर माहिती अशी की, सुरक्षादलाला खबऱ्यांकडून दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सोमवारी सुरक्षादलाने शोध मोहिम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, त्याला जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. या घटनेत लष्कर-ऐ-तैयबाचा टॉप कमांडर बासित अहदम याच्यासह तीन दहशतवादी ठार झाले.
4 मे रोजी झालेला दहशतवादी हल्लादरम्यान, जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात 4 मे रोजी दहशतवाद्यांनी भारतीय वायु सेनेच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला केला, ज्यात वायुसेनेचा एक जवान शहीद झाला, तर इतर 4 जखमी झाले. महत्वाची बाब म्हणजे पुंछ जिल्ह्लायात सुरक्षा दलावर झालेला हा या वर्षातील दुसरा हल्ला आहे. यापूर्वी जानेवारीमध्ये सैन्याच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला होता. तर, त्यापूर्वी डिसेंबरमध्येही सैन्याच्या ताफ्यावर हल्ला झाला, ज्यात चार जवान शहीद झाले होते.