श्रीनगर:जम्मू-काश्मीरमध्ये(Jammu Kashmir) सुरक्षा दलाच्या हाती मोठ यश लागलं आहे. जम्मू-काश्मीरचे(Jammu Kashmir) डीजीपी दिलबाग सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंतनाग(Anantnag Encounter) आणि बांदीपोरामध्ये(Bandipora Encounter) काल रात्री झालेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील हाजीन भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाने इम्तियाज अहमद दारला ठार केल. शाहगुंड बांदीपोरामध्ये नुकत्याच झालेल्या हत्यांमध्ये त्याचा सहभाग होता.
दरम्यान, दिलबाग सिंह यांनी याबाबत माहिती देताना सांगितल की, अनंतनाग आणि बांदीपोरा येथे काल रात्री झालेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत दोन दहशतवादी मारले गेले आहेत. तसेच, काश्मीर झोन पोलिसांनी लष्कर-ए-तय्यबाची शाखा 'द रेझिस्टन्स फ्रंट'(The Resistance Front) चा पर्दाफाश केला. यानंतर, पोलिसांनी मोहम्मद शफी लोन याच्या हत्येच्या कटात सहभागी असलेल्या चार दहशतवाद्यांच्या साथीदारांना अटक केली.
लष्करच्या टीआरएफ मॉड्यूलने कट रचला
जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये तारिक अहमद दार, मोहम्मद शफी दार, मुदासिर हसन लोन आणि बिलाल आह दार यांचा समावेश आहे. पण, खुनामध्ये सामील असलेला इम्तियाज आह दार फरार आहे. तपासादरम्यान, हे देखील उघड झालं की, हत्या पाकिस्तानचा रहिवासी असलेल्या टीआरएफचा हँडलर लाला उमरच्या सांगण्यावरुन करण्यात आली होती.