जम्मू काश्मीरच्या उच्च न्यायालयानं सोमवारी माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना झटका दिला. त्यांची पासपोर्ट जारी करण्याची याचिका उच्च न्यायालयानं फेटाळून लावली. न्यायालयानं पासपोर्ट अथॉरिटीला पासपोर्ट जारी करण्याचे निर्देश द्यावे, अशी विनंती त्यांनी आपल्या याचिकेद्वारे केली होती. पासपोर्ट तयार करण्याचा मेहबुबा मुफ्ती यांचा अर्ज श्रीनगर पासपोर्ट ऑफिसनं फेटाळला कारण पोलिसांनी पडताळणी अहवाल हा पासपोर्ट जारी करण्याच्या विरोधात दिला होता, असं याचिकेवरील सुनावणीदरम्यान जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अली मोहम्मद मगरे यांनी सांगितलं. "अशा परिस्थितीत माझ्या विचारांनुसार न्यायालयाकडून याचिकाकर्त्यांच्या बाजूनं पासपोर्ट जारी करण्याचा आदेश दिला जाऊ शकत नाही. तसंही कोणत्याही व्यक्तीला पासपोर्च जारी करणं किंवा नाही याचं प्रकरण न्यायालयात मर्यादित आहे आणि केवळ संबंधित प्राधिकरणाला सरकारच्या नियमांअंतर्गत कोणत्याही प्रकरणी विचार करण्यास न्यायालय सांगू शकते," असं न्यायाधीशांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे.
Jammu-Kashmir : मेहबुबा मुफ्तींना उच्च न्यायालयाचा झटका; पासपोर्ट जारी करण्याची याचिका फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 08:27 IST
CID नं जारी केला मेहबूबा मुफ्तींना पासपोर्ट जारी करण्याच्या विरोधात अहवाल
Jammu-Kashmir : मेहबुबा मुफ्तींना उच्च न्यायालयाचा झटका; पासपोर्ट जारी करण्याची याचिका फेटाळली
ठळक मुद्देCID नं जारी केला मेहबूबा मुफ्तींना पासपोर्ट जारी करण्याच्या विरोधात अहवालपरराष्ट्र मंत्रालयाद्वारे निर्धारित उच्च स्तरीय फोरममध्ये अपील करू शकतात, पत्रात करण्यात आलं नमूद