काश्मीर- जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्तीनं लष्करावर केलेल्या विधानांनंतर राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. निवडणुकीचा काळ आहे, त्यांचा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे त्या अशी विधानं करत सुटल्या आहेत. त्यांना गांभीर्यानं घेण्याची गरज नाही, असंही जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक म्हणाले आहेत. मुफ्तींच्या विधानानं जवानांच्या मनोधैर्याचं खच्चीकरण होऊ देणार नसल्याचंही राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.तर मुफ्तींनीही मलिक यांच्या विधानाचा ट्विटरवरून चांगलाच समाचार घेतला आहे. जवानांबरोबर जी चुकीची गोष्ट घडली, त्यावर कारवाई करण्याचा आदेश देण्याऐवजी राज्यपाल राजकीय विधानं करत आहेत. संवैधानिक पदांवर बसलेल्या लोकांनी अशा प्रकारे पक्षपात करत असल्याचं पाहिल्यावर दुःख होते. मुफ्ती यांच्या विधानाला जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी पाठिंबा दर्शवत राज्यपालांवर टीका केली आहे.
त्यांना गांभीर्यानं घेऊ नका, जम्मू-काश्मीरच्या राजपाल्यांनी मुफ्तींवर साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 11:43 AM