Jammu Kashmir Anti-Encroachment Drive: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी (12 फेब्रुवारी) जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या अतिक्रमणविरोधी मोहिमेवरून भाजपवर हल्लाबोल केला. काँग्रेस खासदार म्हणाले की, या केंद्रशासित प्रदेशाला रोजगार, व्यवसाय आणि प्रेम हवे होते, पण त्याऐवजी "भाजपचा बुलडोझर" मिळाला आहे.
7 जानेवारी रोजी महसूल विभागाचे आयुक्त सचिव विजय कुमार बिधुरी यांनी सर्व उपायुक्तांना जम्मू-काश्मीरमधील 100 टक्के अतिक्रमण हटवण्याचे निर्देश दिले होते. तेव्हापासून, जम्मू आणि काश्मीरमधील 10 लाख कनाल (एक कनाल = 605 चौरस यार्ड) पेक्षा जास्त जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यात आले आहे. काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी या प्रमुख राजकीय पक्षांनी या मोहिमेविरोधात आवाज उठवला असून, तातडीने ही कारवाई थांबवण्याची मागणी केली आहे.
राहुल गांधींचे ट्विट एका ट्विटमध्ये राहुल गांधी म्हणाले की, "जम्मू-काश्मीरला रोजगार, उत्तम व्यवसाय आणि प्रेम हवे होते, पण त्यांना काय मिळाले? भाजपचा बुलडोझर. तेथील लोकांची अनेक दशके कष्टाने सिंचन केलेली जमीन हिसकावली जात आहे. त्यांना. शांती आणि काश्मीच्या लोकांची रक्षा एकत्र येण्याने होईल, तोडल्याने नाही.'' राहुल गांधी यांनी एका मीडिया वृत्तालाही टॅग केले ज्यात दावा करण्यात आला होता की या मोहिमेमुळे जम्मू-काश्मीरमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
मेहबुबा मुफ्ती यांनीही विरोध केलाया अतिक्रमणविरोधी मोहिमेविरोधात जम्मू-काश्मीरमध्येही बरीच निदर्शने होत आहेत. बुधवारी (8 फेब्रुवारी), पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनीही निषेध मोर्चा काढला. जम्मू-काश्मीरमध्ये गुंडा राज असल्याचा आरोप त्यांनी केला. तर, जेके डेमोक्रॅटिक आझाद पक्षाचे प्रमुख गुलाम नबी आझाद बुधवारी अतिक्रमण विरोधी मोहिमेवरुन म्हणाले की, केंद्राने कलम 370 आणि 35A रद्द केल्याबद्दलचा संताप कमी झाला होता. पण, या मोहिमेने (अतिक्रमणविरोधी मोहीम) अधिक नुकसान केले आहे.