शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
4
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
5
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
6
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
7
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
8
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
9
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
10
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
11
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
12
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
13
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
14
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
15
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
16
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
17
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
18
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
19
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
20
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट

25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 7:12 PM

Jammu-Kashmir Lok Sabha Election 2024 : काश्मीरमध्ये दहशतवादाचे युग सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच कोणत्याही संघटनेने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली नाही.

Jammu-Kashmir Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी आज चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले. विशेष म्हणजे, कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेल्या पहिल्याच निवडणुकांबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. 2024 मध्ये पहिल्यांदाच तीन दशकांहून अधिक काळापासून दहशतवादाने त्रस्त असलेल्या श्रीनगरमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान झाले.

केंद्रातील मोदी सरकारने 2019 साली राज्यातून कलम 370 हद्दपार केले होते. यासोबतच जम्मू-काश्मीर आणि लडाख, या दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती झाली. त्यनंतर पहिल्यांदाच येथे निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांबाबत मतदारांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगर भागात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 35.75% मतदान झाले. हा गेल्या पंचवीस वर्षातील सर्वोच्च आकडा आहे.

रेकॉर्डब्रेक मतदानयापूर्वी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत येथे 14.1 टक्के, 2014 मध्ये 25.9 टक्के, 2009 मध्ये 25.06 टक्के, 2004 मध्ये 18.06 टक्के आणि 1999 मध्ये 11.9 टक्के मतदान झाले होते. त्याआधी जम्मू-काश्मीरमधील दहशतवादग्रस्त भागात अनेकवेळा निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या होत्या. म्हणजेच यंदाच्या निवडणुकीत या भागात सर्वाधिक मतदान झाले आहे. दहशतवाद्यांची भीती नसल्यामुळे लोकांनी मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडून मतदान केले.

यावेळी श्रीनगर जागेसाठी 24 उमेदवार असून, मतदारसंघात एकूण 17.48 लाख मतदार आहेत. लडाख वेगळा झाल्यानंतर जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात लोकसभेच्या पाच जागा आहेत. यात - बारामुल्ला, श्रीनगर, अनंतनाग-राजौरी, उधमपूर आणि जम्मू. अनंतनाग-राजौरीमध्ये 7 मे रोजी निवडणुका होत्या, पण त्या पुढे ढकलण्यात आल्या. आता 25 मे रोजी येथे निवडणूक होणार आहे. विशेष म्हणजे, काश्मीरमध्ये दहशतवादाचे युग सुरू झाल्यानंतर, म्हणजे गेल्या 35 वर्षांत पहिल्यांदाच कोणत्याही संघटनेने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केलेली नाही.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Jammu Kashmirजम्मू-काश्मीरElectionनिवडणूकVotingमतदान