जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या दोन चकमकीत तीन अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत. तसेच एक जवान बेपत्ता आहे. शहीद झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये लष्करातील एक कर्नल, एक मेजर आणि पोलीस डीएसपीचा समावेश आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपचे डीएसपी हुमायूं भट्ट यांच्या पश्चात पत्नी आणि दोन महिन्यांची मुलगी आहे. गेल्या वर्षीच त्यांचं लग्न झालं.
डीएसपी हुमायूं भट्ट हा माजी डीआयजी गुलाम हसन भट्ट यांचा मुलगा होता आणि तो मूळचा पुलवामा जिल्ह्यातील त्रालचा होता. त्याचे कुटुंब आता श्रीनगर विमानतळाजवळील हुमहामा येथील व्हीआयपी कॉलनीत राहते. दोन महिन्यांच्या मुलीचे वडील आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे निवृत्त महानिरीक्षक गुलाम हसन भट्ट यांचा मुलगा हुमायूं भट्ट यांचा अतिरक्तस्त्रावामुळे मृत्यू झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कर्नल सिंग यांनी त्यांच्या टीमचे नेतृत्व करत दहशतवाद्यांवर हल्ला केला. मात्र, दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि ते गंभीर जखमी झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मेजर आशिष आणि डीएसपी भट्ट यांनाही गोळ्या लागल्या असून ते गंभीर जखमी झाले आहेत. उपचारादरम्यान ते शहीद झाले.दोन महिन्यांच्या मुलीचे वडील आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे निवृत्त महानिरीक्षक गुलाम हसन भट्ट यांचा मुलगा हुमायूं भट्ट यांचा अतिरक्तस्त्रावामुळे मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, गडुलमध्ये दोन ते तीन दहशतवादी दिसले आणि त्यांना घेरण्यात आले. लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. या ऑपरेशनचे नेतृत्व कर्नल सिंग या अधिकाऱ्याने केले होते ज्यांना यापूर्वी सेना पदक मिळाले होते. झाडांच्या मागून सैन्यावर गोळीबार केला जात होता. सुरुवातीच्या गोळीबारात तीन अधिकारी गंभीर जखमी झाले. श्रीनगरच्या बटवारा येथील लष्करी रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. इतर जखमींना विमानाने श्रीनगरमधील लष्कराच्या 92-बेस रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.