जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील शोपियाँमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याचे वृत्त आहे. या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. अद्याप सर्च ऑपरेशन सुरू आहे. काश्मीर झोन पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे.
काश्मीर झोनच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोपियाँच्या झैनपोरा भागातील चेरमार्गमध्ये चकमक सुरू आहे. पोलीस आणि सुरक्षा दल या ठिकाणी तैनात आहेत. दरम्यान, शनिवारी सकाळी दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला. त्यावेळी दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यात चकमक सुरू झाली.
या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. तर चेरमार्गमध्ये अजून किती दहशतवादी आहेत, याची माहिती अद्याप मिळालेली नाही, मात्र सुरक्षा दलांनी परिसराला चारही बाजूंनी वेढा घातला असून, शोध मोहीम सुरू आहे. तसेच, दोन्ही बाजूंनी गोळीबार झाल्याचीही माहिती आहे.
लपलेल्या दहशतवाद्यांकडून गोळीबारपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांना चेरमार्ग, झैनपोरा येथे दहशतवादी दिसल्याची माहिती मिळाली होती. यानंतर एसओजी, लष्कर आणि सीआरपीएफचे संयुक्त पथक तेथे पोहोचले आणि त्यांनी शोध मोहीम राबवली. सुरक्षा दलांनी आत्मसमर्पण करण्यास सांगितले, तेव्हा लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. यानंतर सुरक्षा दलांनीही चोख प्रत्युत्तर दिले आणि एका दहशतवाद्याला ठार केले.