राजौरी - काश्मिरी पंडितांचे विस्थापन आणि हत्या, यावर आधारीत चित्रपट द कश्मीर फाइल्सवरून अद्यापही वाद सुरूच आहे. या चित्रपटाविरोधात जम्मू-काश्मीरमधील एका मशिदीच्या मौलानाने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मौलाना काही लोकांना संबोधित करताना म्हणाले, 'आम्ही या देशावर 800 वर्षे राज्य केले आहे, यामुळे देवाची शपथ, तुम्ही नष्ट व्हाल, आमचं अस्तित्व संपणार नाही.'
'कश्मीर फाइल्स' बॅन करावा - मौलाना मशिदीत लोकांना संबोधित करताना मौलाना फारूक म्हणाले, काश्मिरी मुस्लिमांच्या वेदना विसरल्या गेल्या. हजारो मुस्लीम मारले गेले, त्यांच्याबद्दल चर्चा नाही, मात्र आज समाजात फूट पाडण्यासाठी चित्रपट बनवला गेला आहे. मौलाना फारुख म्हणाले, आम्ही या देशावर 800 वर्षे राज्य केले, या लोकांनी 70 वर्षे राज्य केले, आमची ओळख पुसणे शक्य नाही. याच वेळी त्यांनी या चित्रपटावर बंदी आणावी अशी मागणीही केली आहे.
व्हिडिओ व्हायरल होताच मागीतली माफी - सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये, मौलाना म्हणत आहेत, हा चित्रपट बंद व्हायला हवा. तुम्ही 70 वर्षांच्या सत्तेत आमची ओळख पुसण्याचा प्रयत्न करत आहात. देवाची शपथ तुम्ही नष्ट व्हाल. पण कलमा वाचणारे कधीही नष्ट होणार नाहीत. मात्र, या वक्तव्यांनंतर या मौलानाने एक व्हिडिओ जारी करत माफीही मागितली आहे.