- हरीश गुप्ता नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरला असलेला विशेष दर्जा रद्द करणारी विधेयके मंगळवारी लोकसभेत संमत होत असल्याचा इतिहास घडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाक का वाजवला नाही याचे रहस्य आता उलगडत आहे.सोमवारी सकाळी मंत्रिमंडळाची बैठक सात लोकनायक मार्गावर घेण्यात आली. परंतु, मोदी नेहमी जसे सुहास्य वदनाने असतात तसे ते या बैठकीत नव्हते याचे त्यांच्या सहकारी मंत्र्यांनाही काहीसे आश्चर्य वाटले. मोदी जेव्हा मंगळवारी सायंकाळी शेवटच्या तासात लोकसभेत आले तेव्हा ३७० खासदारांनी त्यांचे उभे राहून टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. यावेळीही ते ना हसले ना ऐतिहासिक क्षणाचा आनंद व्यक्त होत असताना त्यात सहभागी झाले.गृहमंत्री अमित शहा यांना त्यांचे भाषण सुरू असताना वारंवार दाद मिळत होती. तरीही नरेंद्र मोदी यांनी आपण तणावात असल्याचे भाव दर्शवले. मोदी हे नेहमी असतात त्या व्यक्तित्त्वाचे या ऐतिहासिक क्षणाला नव्हते. गेल्या महिन्यात संसदेत अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामण सादर करीत होत्या तेव्हा मोदी यांनी १०० वेळा बाक वाजवला होता. ऐतिहासिक ठरलेले वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विधेयक लोकसभेत संमत झाले तेव्हा मोदी हे बाक वाजवत होते. परंतु, जम्मू आणि काश्मीरशी संबंधित विधेयके संमत झाली तेव्हा एकदाही त्यांनी बाक वाजवला नाही. मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना त्यांनी मोठा प्रवास पुढे करायचा आहे त्यामुळे कृपा करून मोठा आनंद आताच व्यक्त करू नका, असेही सांगितले नाही.
सुरक्षेवरील मंत्रिमंडळ समितीने (सीसीएस) जम्मू आणि काश्मीरशी संबंधित विधेयके पुढे जाऊ दिली केंद्रीय मंत्रिमंडळाने नव्हे. मोदी हे सीसीएसच्या बैठकीनंतर शहा यांच्यासोबत मंत्रिमंडळाच्या खोलीत आले. मंत्रिमंडळाची संमती मागण्यात आली नाही. त्याऐवजी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी मोदी निर्णय जाहीर करीत असताना वारंवार बाके वाजवली.प्रकाशझोत अमित शहांवरपक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितल्यानुसार जम्मू आणि काश्मीरची ही विधेयके याच सत्रात संमत झाली पाहिजेत यावर मोदी ठाम होते.त्यासाठीच त्यांनी अधिवेशन कामकाजाचे पूर्ण १० दिवस वाढवलेही होते. त्याचे श्रेय न घेता मोदी यांनी मंत्रिमंडळातील त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अमित शहा यांना आघाडीवर स्थान मिळेल, अशी व्यवस्था केली.या विधेयकांसंबंधित सगळा प्रकाशझोत शहा यांच्यावरच असावा व आपल्याकडे न यावा म्हणून मोदी यांनी चर्चेत शब्दश: एकदाही हस्तक्षेप केला नाही. वस्तुस्थिती अशी आहे की, मोदी यांनी सोमवारी सकाळी आपल्या निवासस्थानी मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत एकही भाष्य करायचे नाही, असे ठरवले होते.