शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING : अन् काही मिनिटांत चांदीचं झालं सोनं; भालाफेकपटू नवदीप भारताचा नवा 'गोल्डन बॉय'
2
सरकार मोठा शॉक द्यायच्या तयारीत; क्रेडीट, डेबिट कार्डने पेमेंट केल्यास १८ टक्के जीएसटी
3
Paris Paralympics 2024: दृष्टीहीन Simran Sharma ची कमाल; भिंगरीसारखी धावली अन् पटकावलं मेडल
4
'महायुतीने जागा दिल्या नाही, तर महाराष्ट्रात स्वबळावर लढू'; राजभरांचा इशारा
5
उत्तर प्रदेशात तीन मजली इमारत कोसळली; २८ जणांना काढलं बाहेर, आजूबाजूचा परिसर केला रिकामा
6
तेलंगणात पुरामुळे २९ लोकांचा मृत्यू; ५,४३८ कोटी रुपयांचे नुकसान
7
छोटा पुढारीला बिग बॉसने दिला नारळ, घनःश्याम दरवडेचा सहा आठवड्याचा प्रवास संपला
8
पाकिस्तानचा लवकरच सौदी अरेबिया होणार; भर समुद्रात मोठे घबाड सापडले
9
महिला, पुरुष दोन्हीही, जर ९ ते ५ नोकरी करत असाल तर...; हा सिंड्रोम गाठणार हे नक्की
10
Puja Khedkar : पूजा खेडकरला आणखी दणका! केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
11
पाकिस्तानातील पुढची पिढी अडाणीच राहणार; करोडो मुले शाळेत जातच नाहीत
12
बीएमडब्लूची टेस्ट ड्राईव्ह घ्यायला गेला अन् दोघांना उडवलं; मुलुंड अपघात प्रकरणी आरोपीला अटक
13
उत्तर कोरियात किम जोंग उनची सत्ता उलथविण्याची तयारी? मोठी शक्ती लागली कामाला
14
"फितूरीचे संस्कार दाखवले"; बार्शीहून ३०० गाड्या आल्या, जरांगेंचा आमदार राऊतांवर हल्लाबोल
15
करोडपती बनणे एकदम सोपे, एकदाच गुंतवा १ लाख रुपये; नंतर निवांत व्हा मालामाल; गणित समजून घ्या
16
कोलकात्यात रुग्णालयाचा नवा वाद; ३ तास रक्तस्त्राव, उपचाराअभावी मुलाचा मृत्यू
17
"भाजपाला शिवरायांचा इतिहास माहित नाही"; 'खंडणी' शब्दावरुन आरोप; जयंत पाटलांनी सुनावले
18
भाजपमध्ये तिसऱ्या दिवशीही राजीनामे थांबेनात; 72 नेत्यांचा पक्षाला रामराम
19
सेलेना गोमेज 32व्या वर्षीच बनली तरुण अब्जाधीश; 'या' कंपनीने केले मालामाल
20
'मराठा आरक्षणाबद्दल मविआकडून लिहून घ्या', राजेंद्र राऊतांचे आव्हान; जरांगेंनीही चॅलेंज स्विकारले

बस दरीत कोसळली नसती तर सर्वांना गोळ्या घातल्या असत्या; प्रत्यक्षदर्शिंनी सांगितली आपबीती...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 5:02 PM

9 जून रोजी वैष्णवदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यात 10 जणांचा मृत्यू झाला तर 41 जखमी झाले.

Jammu Kashmir Riasi Attack : 9 जून रोजी एकीकडे केंद्र सरकारचा शपथविधी सोहळा सुरू होता, तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरमधील रियासी येथे वैष्णवदेवीला जाणाऱ्या भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाला, तर 41  जण जखमी झाले. दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार केल्यानंतर एक गोळी चालकाला लागली, ज्यामुळे त्याचे बसवरील नियंत्रण सुटले अन् गाडी थेट दरीत कोसळली. आता या घटेबाबात एत धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, त्या बसमध्ये उत्तर प्रदेश आणि राजस्थानेचे भाविक होते. ते सर्वजण माता वैष्णदेवीच्या दर्शनासाठी कटरा येथे जात होते. बस जंगल परिसरात येताच दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. या हल्ल्यावेळी गोंडा येथील एक तरुणी बसमध्येच होती. तिने घडलेली सर्व घटना मीडियाला सांगितली. 'दहशतवादी सलग 15 मिनिटे गोळीबार करत होते. चालकाचे नियंत्रण सुटून बस दरीत कोसळली नसती, तर दहशतवाद्यांनी सगळ्यांना गोळ्या घालून ठार केले असते,' अशी माहिती तिने दिली. 

दिल्लीतील रहिवासी शंकर हेदेखील आपल्या पत्नी आणि दाेन लहान मुलांसह याच बसमधून जात हाेते. दहशतवाद्यांनी 10 ते 15 सेकंदांमध्ये 20 ते 25 गाेळ्या बसवर झाडल्या. एक गाेळी बसचालकाला लागली आणि त्यामुळे बस अनियंत्रित झाल आणि दरीत खडकांमध्ये अडकली. काही जण ‘हमला हाे गया हैं’, असे ओरडू लागल्याचे शंकर यांनी सांगितले.  

बसमध्ये स्वार असलेल्या तरुणाने सांगितले...वाराणसीतील रहिवासी अतुल आपल्या पत्नीसोबत बसमध्येत होता. त्याने सांगितले की, तो पुढच्या सीटवर बसला आहे. अचानक गोळ्यांचे आवाज येऊ लागले. बसच्या पुढील काचा फुटल्या. त्यानंतर सर्व प्रवासी सीटखाली लपून बसले. काही वेळातच बस दरीत कोसळली. 

तीन संघटनांनी घेतली हल्ल्याची जबाबदारी पीपल्स ॲंटी रेसिस्ट फाेर्स, रिव्हायवल ऑफ रिझिस्टन्स आणि द रेझिस्टंट फाेर्स या लष्कर-ऐ-ताेयबा आणि जैश-ए-माेहम्मद या दहशवादी संघटनांशी संबंधित संघटनांनी हल्ल्याची जबाबदारी घेतली हाेती. मात्र, नंतर त्यांनी जबाबदारी झटकली. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादीDeathमृत्यू