शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी 'त्या' अधिकाऱ्याला मिळत होता वर्षाकाठी 'फिक्स पगार'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 9:40 AM

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देविंदरने नाविदला प्रवास करण्यासाठी आणि सुरक्षित स्थळी लपविण्यासाठी हिजबुलकडून पैसे घेतले

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना मदत केल्याप्रकरणी अटक असलेले माजी डीएसपी देविंदरसिंग यांच्याबाबत धक्कादायक खुलासा समोर आला आहे. दहशतवाद्यांकडून देविंदर सिंग यांना वर्षभराचा फिक्स पगार दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनकडून मिळत असे. हिजबुलचा दहशतवादी नवीद मुश्ताक याच्यासमवेत देविंदरला 11 जानेवारी रोजी पकडण्यात आले होते त्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले होते. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार तपास अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

जम्मूहून पाकिस्तानला जाण्याची योजनासूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देविंदरने नाविदला प्रवास करण्यासाठी आणि सुरक्षित स्थळी लपविण्यासाठी हिजबुलकडून पैसे घेतले, तसेच वर्षभर त्याला मदत करण्यासाठी ठरल्याप्रमाणे पैसे घेतले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हा त्याला पकडले गेले, तेव्हा तो नावेदला हिवाळ्यात राहण्यासाठी जम्मूला घेऊन जात होता. त्यानंतर तेथूनच त्याला पाकिस्तानला जायचं होतं.

पोलीस अधिकाऱ्यानेच दहशतवाद्यांशी केली हातमिळवणी; एनआयएने दाखल केला गुन्हा

त्या अधिकाऱ्याने सांगितले की ते पाकिस्तानात जाण्यासाठी कोणत्या मार्गाचा वापर करणार होते. त्याचा तपास केला जात आहे. दविंदर 20-30 लाख रुपयांवर तडजोड केली होती. पण त्याला पूर्ण पैसे दिले गेले नाहीत. नाविदला त्याने आधीच जम्मूला नेले होते. तो बर्‍याच वर्षांपासून नाविदच्या संपर्कात होता आणि त्याच्या पेरोलवर काम करत होता. त्याला नियमांनुसार हिजबुलकडून पैसे मिळायचे.तपासात मदत करत नाही

दहशतवाद्यांची ने-आण करणारा पोलीस अधिकारी राष्ट्रपती पदक विजेता; लाखो रुपये उकळले

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा यंत्रणांना इरफानच्या फोनवरून नाविदविषयी माहिती मिळाली होती. त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. इरफान हा वकील होता ज्याला नाविदसोबत पोलिसांनी पकडला होता. संभाषणातून समजले की तो आय १० या गाडीतून 11 जानेवारीला निघणार आहे त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. देविंदर तपासात सहकार्य करीत नाही. तो त्याच्या फोनमधील संपर्क पण ओळखत नाही असं तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. 

धक्कादायक...! श्रीनगर विमानतळाचा पोलिस अधिकारीच दहशतवाद्यांना कारमधून सोडत होता

दहशतवाद्यांना मदत करण्याच्या आरोपाअंतर्गत जम्मू काश्मीरचे डीएसपी देविंदर सिंहला अटक केल्याने खळबळ उडाली होती. या निलंबित अधिकाऱ्याविरुद्ध आता राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) चौकशी करत आहे. या चौकशीत अनेक धक्कादायक गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. एनआयएने देविंदरविरोधात शस्त्रास्त्र कायदा आणि यूएपीए कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच युएपीए कायद्याच्या कलम 18, 19, 20 आणि 38, 39 नुसार गुन्हा नोंदविला आहे.

काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांसोबत राष्ट्रपती पदक विजेत्या पोलीस उपअधीक्षकाला अटक 

टॅग्स :terroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliceपोलिसTerrorismदहशतवादNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा