श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. मंगळवारी (26 नोव्हेंबर) या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे. तसेच शोपियान येथील चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले आहे.
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पुलवामामध्ये चकमक सुरू झाली. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. तसेच शोपियान येथील चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे.
जम्मू-काश्मीरच्या गांदरबलमध्ये याआधी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी (12 नोव्हेंबर) चकमक सुरू झाली. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. तसेच बांदीपोरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सोमवारी (11 नोव्हेंबर) चकमक झाली. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते.
मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये काही दिवसांपूर्वी आयईडी स्फोट झाल्याची माहिती समोर आली होती. या स्फोटात पाच जण जखमी झाले होते. जखमींमध्ये चार पोलीस कर्मचारी आणि एका नागरिकाचा समावेश होता. मंगळवारी (5 नोव्हेंबर) सकाळी 9.30 च्या सुमारास मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये आयईडी स्फोट झाला. इंफाळच्या थंगल बाजारातील शनि मंदिराजवळ हा स्फोट झाला आहे. या स्फोटात चार पोलीस कर्मचारी आणि एक नागरिक जखमी झाले. जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. इंफाळमधील हा परिसर हाय सिक्युरिटी असणारा समजला जातो. कोणत्याही दहशतवादी संघटनेने अद्याप या स्फोटाची जबाबदारी घेतलेली नाही. याआधी काही दिवसांपूर्वी तेलीपाटी परिसरात एक स्फोट झाला होता. त्यामध्ये बीएसएफचे तीन जवान जखमी झाले होते.