शहरं
Join us  
Trending Stories
1
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
2
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
3
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
4
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
5
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
8
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
9
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
10
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
11
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
12
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
13
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
14
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
16
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
17
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
18
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
19
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल

Jammu & Kashmir: डोवाल नाही; मोदींच्या 'या' मोहऱ्याने वर्षभरापूर्वीच लिहिली काश्मीरची पटकथा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2019 7:36 PM

केंद्र सरकारने अमरनाथ यात्रा रद्द करत काश्मीरमध्ये सैन्याची कुमक वाढविली होती.

नवी दिल्ली : पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करून खळबळ उडवून देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विश्वासू आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यामागे महत्वाची भूमिका बजावली आहे. मात्र, जम्मू काश्मीरचे 370 कलम रद्द करण्याची पटकथाच मोदींच्या एका वेगळ्या मोहऱ्याने लिहिली होती. 

छत्तीसगढ केडरचे आयएएस अधिकाऱ्याने साधारण वर्षभरापूर्वी काश्मीरचे 370 कलम रद्द करण्यापासून ते सुरक्षा व्यवस्था कशी ठेवावी याचे नियोजन केले होते. यासाठी हा अधिकारी गेल्या वर्षभरापासून काश्मीरमध्ये तळ ठोकून होता. या काळात पाकिस्तानवर एअर स्ट्राईकही झाला. याच काळात काश्मीरचे 370 कलम बदलण्याचा मार्ग आखण्यात आला. 

केंद्र सरकारने अमरनाथ यात्रा रद्द करत काश्मीरमध्ये सैन्याची कुमक वाढविली होती. काश्मीरला भारताचे राज्य बनवितानाचे प्रयत्न करत असताना तेथील फुटीरतावादी दंगल घडवू शकतात याची कल्पना या अधिकाऱ्याला होती. यामुळे वर्षभर आधीपासूनच या अधिकाऱ्याने काश्मीर भारताचा केंद्रशासित प्रदेश बनविण्याची योजना आखली होती. या योजनेनुसारच केंद्र सरकारने पाऊले टाकली आणि यशस्वी झाली. 

या अधिकाऱ्याचे नाव आहे बीव्हीआर सुब्रमण्यम. त्यांनी आखलेल्या योजनेनुसारच अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. सुब्रमण्यम हे छत्तीसगढचे 1987 बॅचचे आयएएस अधाकारी आहेत. ते सध्या जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव आहेत. मोदींनी मोठी जबाबदारी सोपवत सुब्रमण्यम यांना जम्मू काश्मीरमध्ये पाठविले होते. महत्वाचे म्हणजे त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशीही चांगले संबंध होते. यामुळे छत्तीसगढमध्ये तीन वर्ष होताच त्यांना पुन्हा केंद्रामध्ये बोलावण्यात आले होते. डोवाल यांच्या शिफारशीमुळेच सुब्रमण्यम यांची काश्मीरमध्ये नियुक्ती झाली होती. 

सुब्रमण्यम यांनी काश्मीरची जबाबदारी घेतल्यानंतर केंद्राने त्यांच्या अधिकाराखाली विश्वासू अधिकाऱ्यांची पूर्ण फलटणच उभी केली होती. रणनीतीनुसार तामिळणाडूचे सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी के. विजय कुमार यांना राज्यपालांचे सल्लागार बनविण्यात आले. त्यांचा संबंधही छत्तीसगढशी आलेला आहे. तेव्हा सुब्रमण्यम गृह विभागाचे सचिव होते आणि बस्तरच्या नक्षलवादावर अंकूश ठेवला होता. 

टॅग्स :Article 370कलम 370Article 35 Aकलम 35-एJammu Kashmirजम्मू-काश्मीरAjit Dovalअजित डोवालNarendra Modiनरेंद्र मोदी