श्रीनगर : जम्मू येथील बस बस स्टँडवर गुरुवारी ग्रेनेड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात यात एक नागरिकाचा मृत्यू झाला असून ३२ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, हा ग्रेनेड हल्ला करण्यामागे हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
ग्रेनेड हल्ल्याप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली. फारूख अहमद भट उर्फ ओमर असे या अटक करण्यात व्यक्तीचे नाव आहे. कुलगाममधील हिजबुल मुजाहिद्दीनचा जिल्हा कमांडर फारूक अहमद भट्ट याने यासीरला ग्रेनेड हल्ला करण्यास सांगितले होते, अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली.
गुरुवारी जम्मूमधील बस स्टँडवरील तिकीट खिडकीच्या दिशेने ग्रेनेड हल्ला करण्यात आला.या हल्ल्यात यात एक नागरिकाचा मृत्यू झाला असून ३२ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर अलर्ट जारी करण्यात आला असून ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. चोख सुरक्षा व्यवस्था असतानाही ग्रेनेड हल्ला झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.