श्रीनगर - जगभरातील अनेक देश कोरोना संकटाचा सामना करत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जम्मू-काश्मीरसह देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये यासाठी वारंवार प्रशासनाकडून आवाहन देखील करण्यात येत आहे. तर दुसरीकडे सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील मेलहूरा परिसरामध्ये बुधवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं.
जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील मेलहूरा परिसरामध्ये बुधवारी ( 22 एप्रिल) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे. दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.
काही दिवसांपूर्वी भारतीय सैन्याला काश्मीरमधील विविध भागांमध्ये केलेल्या कारवाईत 9 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले होते. अवघ्या 24 तासांत सैन्याने हे मोठं यश मिळवले होते. मात्र या कारवाईदरम्यान एक जवान शहीद झाला तर इतर दोन जण गंभीर जखमी झाले होते. केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तर दक्षिण काश्मिरमधील बाटपुरा येथे चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. अशा एकूण 9 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus: जगाचा आकडा २५ लाखांवर; राज्यात एकूण ५,२१८ रुग्ण
CoronaVirus: निर्बंध उठवण्याची घाई ठरेल घातक; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा