जामनेरच्या विद्यार्थ्याला दोघांनी बदडले क्षुल्लक कारण : बहिणाबाई उद्यानाजवळ घडली घटना
By admin | Published: August 05, 2016 10:25 PM
जळगाव : क्षुल्लक कारणावरून दोन तरुणांनी जामनेर येथील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्याला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास बहिणाबाई उद्यान परिसराजवळ घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी मारहाण करणार्या दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले होते. दोघांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडण्यात आले.
जळगाव : क्षुल्लक कारणावरून दोन तरुणांनी जामनेर येथील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्याला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास बहिणाबाई उद्यान परिसराजवळ घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी मारहाण करणार्या दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले होते. दोघांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडण्यात आले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर येथील रहिवासी असलेला एक विद्यार्थी मू.जे. महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. त्याने वर्गातील एका विद्यार्थिनीसोबत मैत्री केली. ही बाब त्या विद्यार्थिनीच्या आधीच्या मित्राला खटकली. याच कारणावरून दोन्ही तरुणांमध्ये यापूर्वी वाद झाला होता. त्या वेळी विद्यार्थिनीच्या आधीच्या मित्राने त्याला पाहून घेण्याची धमकी दिली होती. शुक्रवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास जामनेरचा तरूण महाविद्यालयात जात असताना त्याला दोन तरुणांनी रस्त्यात अडवले. दोघांनी त्याला शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण केली. मारहाण करणारे दोघेही तरुण त्या विद्यार्थिनीच्या आधीच्या मित्राचे सहकारी होते. या मारहाणीच्या घटनेची माहिती झाल्यानंतर जिल्हापेठ पोलिसांच्या गस्ती पथकातील पोलीस कर्मचार्यांनी तिघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.प्रतिबंधात्मक कारवाईनंतर सोडलेमारहाण करणार्या दोन्ही तरुणांना पोलिसांनी समज दिली. त्यानंतर दोघांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून देण्यात आले. महाविद्यालयीन तरुणांमध्ये आक्रमकपणा वाढत चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. विद्यार्थीवर्गाचे समुपदेशन झाले पाहिजे, असे मत शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.