शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
3
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
4
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
5
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
6
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
7
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
8
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
9
पुण्यात भाजपाला आणखी एक धक्का बसणार, माजी खासदार तुतारी फुंकणार? 
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

जमशेदजी टाटांवरील नाण्याचे आज अनावरण

By admin | Published: January 06, 2015 1:47 AM

सरकार लवकरच टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी नुसेरवानजी टाटा यांच्या १७५ व्या जयंतीनिमित्त आज नाणे जारी करणार आहे.

नवी दिल्ली : सरकार लवकरच टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी नुसेरवानजी टाटा यांच्या १७५ व्या जयंतीनिमित्त आज नाणे जारी करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.पंतप्रधानांच्या घरातील एका छोटेखानी समारंभात १०० व पाच रुपयांच्या नाण्याचे मंगळवारी अनावरण केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. जमशेदजी टाटा यांना आधुनिक भारतीय उद्योगाचे जनक म्हणून ओळखले जाते. केंद्र सरकारकडून अशा प्रकारचा सन्मान दिले जाणारे ते पहिले उद्योगपती ठरतील. यापूर्वी, सरकारने १९५८ आणि त्यानंतर १९६५ साली जमशेदजी यांच्या सन्मानार्थ पोस्ट तिकीट प्रसिद्ध केले होते.अधिकाऱ्याने सांगितले की, टाटा हे एक ख्यातनाम व्यक्ती होते आणि सरकारचा या निर्णयाद्वारे भारतीय उद्योगाला प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे. याचमुळे जमशेदजी टाटा यांना सन्मानित केले जाणार आहे. दरम्यान, सरकार आतापर्यंत कलाकार, स्वातंत्र्यसैनिक, शास्त्रज्ञ, संस्था व संघटना यांच्या सन्मानार्थ नाणे जारी करत असे. (लोकमत न्यूज नेटवर्क)