यूपीच्या एसडीएम ज्योती मौर्य यांचा वाद चव्हाट्यावर आल्यानंतर अनेक पतींनी आपल्या पत्नीचं शिक्षण बंद केलं आहे. पण याउलट पती-पत्नीच्या नात्यातलं सत्य सांगणारी घटना समोर आली आहे. बिहारच्या जमुई येथील एका पत्नीने पतीचं शिक्षण सुरू ठेवण्यासाठी तिचे दागिने विकले. नवरा सरकारी शाळेत शिक्षक आहे आणि मुलांना शिकवण्याच्या नवनवीन पद्धतींबद्दल सतत चर्चेत असतो.
जमुई जिल्हा मुख्यालयाच्या कल्याणपूरच्या माध्यमिक शाळेतील शिक्षक जितेंद्र शार्दुल यांची गोष्ट संघर्षांनी भरलेली आहे. केवळ तीच नाही तर त्याची पत्नी संजना हिनेही आपल्या पतीला यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली. शिक्षक जितेंद्र मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने शिकवतात. कधी त्यांच्यासोबत गाणं-नाचणं, तर कधी धमाल-मस्ती करून वर्गातील वातावरण आनंदी ठेवलं जातं. त्यांच्या या कलेमुळे त्यांचं कौतुकही होत असून मुलांबरोबरच पालकही खूश आहेत.
जितेंद्र शार्दुल यांनी लहानपणापासूनच संघर्ष केला. लग्नानंतर आई जेव्हा सासरी आली तेव्हा सहाव्या दिवसापासूनच तिने मजुरीचं काम सुरू केल्याचं सांगितले. ज्या महिलेचं नुकतच लग्न झालं आहे आणि तिच्या हातावर मेहंदी गेली नाही, तिला मजूर म्हणून काम करावं लागलं. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अशी होती की ते पडलेलं पीठ उचलून भाकरी करून खाय़ची. जितेंद्र मॅट्रिकमध्ये शिकत असताना वडिलांचा अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी कोळसा कामगार म्हणून काम केलं.
बायकोने आधार दिला, दागिने विकले
जितेंद्रने सांगितले की, या कठीण काळात माझे लग्न झाले, त्यानंतर माझ्या पत्नीने मला खूप मोलाची साथ दिली. तिने माझ्यात असलेली प्रतिभा ओळखली आणि मला शिकवण्यासाठी आपले दागिनेही विकले. माझे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून ती उपाशी राहिली. घरात भात कमी असला की ती मला खायला द्यायची आणि स्वतः मीठाचं पाणी प्यायची.
पत्नी संजनाने सांगितले की, तिचा पती अत्यंत कठीण प्रसंगातून आज इथपर्यंत पोहोचला आहे. पण जितेंद्रमध्ये एक गोष्ट सगळ्यात चांगली आहे ती म्हणजे ते जे काही ठरवतात ते नक्कीच करतात. त्यांना लहान मुलांबद्दल नेहमीच जिव्हाळा होता. त्यामुळेच शिक्षण क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.