जनसुराज्य पक्षाची पहिली यादी जाहीर
By admin | Published: January 31, 2017 2:06 AM
नागपूर : राष्ट्रीय जनसुराज्य पक्ष व अनुसूचित जाती-जमाती आघाडीने संयुक्तिकरीत्या नागपूर महानगरपालिकेची निवडणूक लढण्याचा निर्धार व्यक्त केला असून त्याअंतर्गत काही प्रभागातील ४० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. जनसुराज्यचे अध्यक्ष राजेश काकडे व एजेजे आघाडीचे मिलिंद खैरकर यांनी पत्रपरिषदेत ही यादी जाहीर केली. दोन्ही पक्ष निवडणुकीत १०० पेक्षा जास्त जागा लढविणार असून इतर जागांसाठी येत्या ३१ जानेवारी व १ फेब्रुवारीला उमेदवारांच्या मुलाखती व उमेदवारी अर्ज वितरित केले जाणार असल्याची माहिती मिलिंद खैरकर यांनी दिली. पत्रपरिषदेला नितीन देव, अनिल रामटेके, चंदू बागडे, अनिलनाथ शील, सुरेश लोखंडे आदी उपस्थित होते.