नवी दिल्ली - देशभरात कृष्णजन्माष्टमीचा उत्साह पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी श्री कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा हा पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला असून मथुरा, द्वारकेसह मुंबईतील इस्कॉन मंदिरात रात्रीपासून भाविकांनी गर्दी केली आहे. मुंबईतही गोपाळकाल्याचा उत्साह शिगेला पोहचला असून गोविंदा पथके दहीहंडी फोडण्यासाठी आतुर झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला जन्माष्टमीच्या ट्विटरवर शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईतल्या धारावी येथील २७ वर्षीय गोंविंदाचा मृत्यू झाला आहे, सायन रुग्णालयात उपचारासाठी नेले असताना मृत घोषित करण्यात आले असून, सध्या पंचनामा सुरू आहे.
गेल्या २० ते २५ दिवसांपासून सुरू असलेला थरांचा सराव, प्रायोजकत्व मिळविण्यासाठीची धडपड, मोठ्या रकमेच्या हंड्या फोडण्याचा मानस, स्पर्धेसह तितकेच खेळीमेळीचे वातावरण आणि थरांवर थर रचण्यासाठी सुरू असलेला उत्साह; असे सारे काही ‘याची देही याची डोळा’ पाहण्याचा योग मुंबईकरांना आज मिळणार आहे.
LIVE UPDATES -
- ठाणे - मुख्यमंत्र्यांच्या हजेरीत जय जवान पथकाने लावले 9 थर
- ठाणे: सेना दलाच्या जवानांनी वर्तकनगरच्या संस्कृती प्रतिष्ठान मंडळाच्या ठिकाणी रचले पाच थर, सकाळपासून 12 महिला गोविंदा पथकांसह 50 पथकांनी लावली हजेरी
- जळगाव : काव्यरत्नावली चौकात दहीहंडीचा उत्साह शिगेला, प्रथमच युवतींची दहीहंडी, थरार पाहण्यासाठी जळगावकरांची प्रचंड गर्दी
- ठाणे : तलावपाळी येथील जांभळी नाक्यावर महादहीहंडी उत्सव
- ठाणे : स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री थोड्याच वेळात ठाण्यात दाखल होणार
- मुंबईत आतापर्यंत विविध ठिकाणी सहा गोविंदा जखमी, जखमी गोविंदांवर रुग्णालयात उपचार सुरू, जेजे हॉस्पिटल 1, केईएम 3, एमटी अग्रवाल 1, एन. देसाई हॉस्पिटल 1, सर्वांची प्रकृती स्थिर.
- ठाणे : जखमी झालेल्या आकाश माळी (16) वर व्ही. एन. देसाई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू, प्रकृती स्थिर.
- ताडदेव येथील एसी मार्केट येथे नगरसेवक अरूण दुधवडकर यांनी आयोजित केलेल्या दहीकाला उत्सवात ३ थर रचणाऱ्या अंध गोविंदा पथकाला उपस्थित गोविंदा पथकांनी टाळ्यांच्या कडकडात सलामी दिली. यावेळी खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते अंध गोविंदांना सन्मानित करण्यात आले.
- ठाणे : रघुनाथनगर संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी मंडळाकडे आतापर्यंत 15 गोविंदा पथकांनी हजेरी लावली आहे. यंदा प्रथमच रस्त्याऐवजी मैदानात मंडळाने दहीहंडी आयोजित केली आहे.
- गोविंदा जपू या सण साजरा करु या, हे यंदाचे मंडळा चे ध्येय असल्यामुळे कुठेही थरांची स्पर्धा ठेवली नसल्याचे मंडळाचे सल्लागार आमदार रविंद्र फाटक यांनी सांगितले.
- काळाचौकी येथे भाजपातर्फे आयोजित दहीकाला उत्सवात पारंपरिक नृत्य सादर करून सिकंदर स्पोर्ट्स क्लब गोविंदा पथकाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
- ठाणे : मनसे आयोजित दहीहंडी उत्सवात शिवतेज महिला गोविंदा पथकाचे सहा थर
- पनवेल : गोकुळाष्टमीनिमित्त पनवेल शहरामध्ये देवांच्या हंड्या फोडण्यात आल्या. पनवेलमध्ये विविध अस्ताने असून वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीने या हंड्या फोडल्या जातात. गोकुळाष्टमी म्हणजे बालगोपाळांचा सण. पनवेल गावामध्ये पारंपारिक पद्धतीने हा सण साजरा केला जातो.
- पनवेल : शेकडो वर्षाची परंपरा कायम ठेवत पनवेल तालुक्यातील अनेक गावात आजही पारंपरिक दहीहंडी उत्साहात साजरी केली जाते.
- ठाणे : मनसे आयोजित दहीहंडी उत्सवात क्लस्टरला विरोध करण्यात आला. यावेळी क्लस्टर विरोधी पोस्टर घेऊन आले आहेत.
- ठाणे : कोपरी गावातील आई चिखलादेवी गोविंदा पथक यांनी यंदा क्लस्टर हटाव गावठाण बचाव तसेच क्लस्टरच्या निषेधाचे फलक घेऊन यावर्षी ठाणे शहरातील हंडी फोडणार आहे.
- ठाणे : भगवती शाळेच्या पटांगणात मनसेतर्फे आयोजित दहीहंडीस जल्लोषात सुरुवात
- दादरमध्ये दहीहंडी साजरी करण्यासाठी गोविंदा पथकांची तयारी सुरू.
- मुंबापुरीत दुमदुमणार गोविंदांचा ‘शोर’; नोटाबंदी, जीएसटीचा आयोजकांना फटका
- विशेष म्हणजे या वर्षी गोविंदा पथकांनी ‘सुरक्षित दहीहंडी, सुरक्षित गोविंदा’ या संकल्पनेखाली गोपाळकाला खेळण्याचे ठरवले आहे.
- एकटेपण जगण्याचा क्षण म्हणजे दहीहंडी; सर्वांच्या मदतीने होते तो काला...
- पावसाच्या हुलकावणीच्या अंदाजामुळे यंदा मुंबईतील दहीहंडीत गोविंदा कोरडाच राहणार
- सुरक्षेला प्राधान्य द्या, बालगोविंदा नकोच! दहीहंडी समन्वय समितीचे पथकांना निवेदन