ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ - वेगळया विदर्भाच्या मागणीसाठी जंतर-मंतरवर आंदोलनासाठी गेलेले राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणेंवर गुरुवारी शाई फेकण्यात आली. अणेंच्या भाषणाच्यावेळी नितेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे घेऊन गोंधळ घातला व त्यांच्या अंगावर शाई फेकली.
श्रीहरी अणे आज दिल्लीत आले आहेत. दुपारी साडेतीनच्या सुमारास ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत बैठक करणार आहेत. दिल्ली सचिवालयात ही बैठक होणार आहे. बैठकीत वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर चर्चा होणार आहे.
श्रीहरी अणे यांनी विदर्भाबरोबर मराठवाडा स्वतंत्र करण्याचा विचार मांडला होता. त्याच्या या मताचे महाराष्ट्र विधिमंडळात तीव्र पडसाद उमटले होते. अणे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विरोधक अडून बसल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज ठप्प झाले होते. अखेर सरकाराला अणे यांच्यामताशी सहमत नसल्याचा खुलासा करावा लागला होता. त्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्यात आला.