नवी दिल्ली : हवामान बदलाचे जगभरातील तापमानावर विपरीत परिणाम हाेत आहेत. विविध खंड आणि प्रदेशातील सरासरी तापमान वाढले आहे. यंदाच्या हिवाळ्यात देशातील काही भागांत सरासरी तापमानात वाढ नाेंदविण्यात आली आहे. देशाच्या सरासरीचा विचार केल्यास जानेवारीत गेल्या ६२ वर्षांतील सर्वाधिक सरासरी तापमानाची नाेंद करण्यात आली आहे. काही ठिकाणी जानेवारी महिना १०० वर्षांतील उष्ण महिना ठरला आहे. जानेवारीमध्ये कडाक्याची थंडी असते. मात्र, तापमान वाढत असून थंडीचे दिवस कमी हाेत आहेत. वाढत्या तापमानामुळे ग्लेशियर्स वितळत आहेत. दाेन दिवसांपूर्वीच उत्तराखंड येथे हिमकडा काेसळून आलेल्या महापुरात अनेकांचा मृत्यू झाला. अशाप्रकारच्या घटना हा धाेक्याचा इशारा आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार दक्षिण भारतातील किमान तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. यावर्षी जानेवारीत १४.७८ अंश सेल्सिअस एवढे सरासरी तापमान नाेंदविण्यात आले आहे. यंदाचा जानेवारी महिना दक्षिण भारतात गेल्या १२१ वर्षांतील सर्वांत उष्ण ठरला आहे. यावेळी २२.३३ अंश सेल्सिअस एवढे सरासरी तापमान नाेंदविण्यात आले आहे. यापूर्वी १९१९ मध्ये २२.१४ तर २०२० मध्ये २१.९३ अंश सेल्सिअस एवढे सरासरी तापमान हाेते. मध्य भारतात १४.८२ अंश सेल्सिअस सरासरी तापमान हाेते. गेल्या १२१ वर्षांत १९५८ मध्ये १५.०६ अंश सेल्सिअस तापमान हाेते. देशाच्या एकूण सरासरीचा विचार केल्यास १९०१ पासून केवळ १९५८ मध्ये १४.७८ अंश सेल्सिअस एवढे सरासरी तापमान नाेंदविण्यात आले हाेते. त्यानंतर यावर्षी एवढे तापमान हाेते. यापूर्वी १९१९ मध्ये सरासरी १५ अंश सेल्सिअस तापमान हाेते. आतापर्यंतचे ते सर्वाधिक किमान सरासरी तापमान ठरले आहे. जानेवारीतील सरासरी तापमान दक्षिण भारत २२.३३ अंश सेल्सिअस मध्य भारत १४.८२ अंश सेल्सिअस १२१ वर्षांतील तुलनावर्ष २०२१ १९१९ तापमान १४.७८ १५.०
यंदाचा जानेवारी १२१ वर्षांतील सर्वाधिक उष्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 6:24 AM