उत्तर प्रदेशातील जौनपूरच्या एका तरुणाने कमाल केली आहे. मेरठच्या चौधरी चरण सिंग युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेल्या विकासने फायनल इयरमध्ये संपूर्ण विद्यापीठात तिसरा क्रमांक पटकावला आहे अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. विकास गुप्ता हा जौनपूर जिल्ह्यातील कोकन पिलकिछा गावचा रहिवासी आहे. निकाल कळताच सर्व हितचिंतकांनी त्यांच्या घरी पोहोचून त्यांचे अभिनंदन केले.
विकासच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, तो डॉक्टर बनून देशाची सेवा करणार आहे. वडिलांनी सांगितले की, मुलगा आता मेरठमध्ये आहे, त्याच कॉलेजमध्ये त्याची इंटर्नशिप सुरू झाली आहे. विकास गुप्ताचे वडील शिवकुमार हे वर्षानुवर्षे सरकारी रुग्णालयासमोर मेडिकल स्टोअर चालवतात. या जोरावर कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि शिक्षण घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
वडिलांनी सांगितले की, विकास लहानपणापासूनच अभ्यासात, वाचनात आणि लेखनात हुशार होता. इंटरमिजिएटनंतर तो NEET च्या तयारीसाठी कोटा राजस्थानला गेला. त्याने 2018 मध्ये NEET परीक्षा उत्तीर्ण केली आणि चौधरी चरण सिंग विद्यापीठात एमबीबीएस अभ्यासक्रमात प्रवेश घेतला.
विकास गुप्ताने त्याची एमबीबीएस अंतिम वर्षाची मार्कशीट सोशल मीडियावर शेअर केली आहे. विकासने आपल्या यशाचे श्रेय आपले आई-वडील आणि शिक्षकांना दिले आहे. या यशाने वडील शिवकुमार आणि आईसह संपूर्ण कुटुंब खूप आनंदी आहे. अनेकांना विकासपासून प्रेरणा मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"