पोलीस अधिकार्याची सरतपासणी जवखेडे तिहेरी हत्याकांड:
By admin | Published: March 23, 2017 5:19 PM
अहमदनगर : जवखेडे तिहेरी हत्याकांड खटल्यात बुधवारी पंच साक्षीदार व सहाय्यक तपासी अधिकारी असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ़ शरद गोर्डे यांची सरतपासणी घेण्यात आली़ यावेळी गोर्डे यांनी घटनेनंतर घेतलेल्या घरझडत्या व कमांडर जीप जप्ती पंचनाम्याची माहिती दिली़
अहमदनगर : जवखेडे तिहेरी हत्याकांड खटल्यात बुधवारी पंच साक्षीदार व सहाय्यक तपासी अधिकारी असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ़ शरद गोर्डे यांची सरतपासणी घेण्यात आली़ यावेळी गोर्डे यांनी घटनेनंतर घेतलेल्या घरझडत्या व कमांडर जीप जप्ती पंचनाम्याची माहिती दिली़ जवखेडे तिहेरी हत्याकांड खटल्याची जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी यांच्या न्यायालयासमोर सुनावणी सुरू आहे़ विशेष सरकारी वकील ॲड़ उज्ज्वल निकम यांनी साक्षीदाराची सरतपासणी घेतली़ गुन्ह्याची फिर्याद दाखल झाल्यानंतर गावातील काही लोकांवर संशय व्यक्त केला गेल्याने त्यांच्या घरांच्या झडत्या घेतल्या़ त्यांच्या घरात मात्र आक्षेपार्ह काही आढळले नाही़ तसेच गुन्ह्यात कमांडर जीपचा वापर झाल्याचे फिर्यादीने संशय व्यक्त केल्याने ही जीप जप्त केल्याचे गोर्डे यांनी सांगितले़ या खटल्याची गुरूवारी सुनावणी सुरू राहणार आहे़