नवी दिल्ली : पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह मान्यवरांनी नेहरू यांना आदरांजली अर्पण केली.चाचा नेहरू यांची जयंती बाल दिन म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्ताने महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरातसह जवळपास सर्व राज्यांत बाल दिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यात लहान मुलांचा सहभाग होता. दिल्लीत मात्र प्रदूषणामुळे शाळांना सुटी असल्याने फारसे कार्यक्रम झाले नाहीत.राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटरवरून देशाच्या पहिल्या पंतप्रधानांना आदरांजली अर्पण केली. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी ट्विट केले की, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा. पंतप्रधान मोदी आसियान शिखर संमेलनासाठी मनिलामध्ये असून, तेथून त्यांनी जवाहरलाल नेहरू यांना आदरांजली अर्पण केली आहे.प्रतिभावान व दयाळू-काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे गुजरातमध्ये प्रचारात आहेत. त्यांनी ट्विट केले की, आज आपण प्रतिभावान आणि दयाळू नेत्याचे स्मरण करत आहोत. पं. नेहरूंनी आपणास मूर्खतापूर्ण कार्यांपेक्षा अधिक भयंकर काहीही असू शकत नाही, याची शिकवण दिली असून, ती आजही महत्त्वाची आहे.आमचे चाचा नेहरू-कोलकात्याच्या एक शाळेमधील विद्यार्थ्यांनीचाचा नेहरू यांच्या प्रतिमेसमोर उभे राहून त्यांना आदरांजली वाहिली
जवाहरलाल नेहरूंना देशभरात आदरांजली, विविध राज्यांत कार्यक्रम : बाल दिन देशभर उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:08 AM