मुंबई: दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील सुविधासोबतच फी दरवाढीचा निर्णय लवकरात लवकर मागे घेण्यात यावा यासाठी जेएनयूच्या विद्यार्थ्यांकडून आज (सोमवारी) संसदेवर मोर्चा काढण्यात आला होता. मात्र दिल्लीपोलिसांनी हा मोर्चा विद्यापीठाजवळच रोखल्याने विद्यार्थ्यांच्या प्राध्यापक संघटनेने संताप व्यक्त केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून हॉस्टेलच्या नियमात बदल यासोबतच फी वाढ, विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयांना टाळे लावल्याविरोधात विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत होते. तसेच विद्यार्थ्यांना ड्रेस कोडचे देखील निर्बंध लादल्याने विद्यार्थ्यांकडून विरोध करण्यात येत होता. यानंतर केंद्र सरकारने तीन सदस्यीय समिती स्थापन करुन फी दरवाढीवर उपाय योजण्याचे आदेश देण्यात आले आहे.
फी दरवाढीविरोधात जेएनयूमधील सर्व विद्यार्थी संघटना एकत्र आल्या होत्या. हॉस्टेलच्या भाड्यामध्ये वाढ करुन ते ६०० रुपये करण्यात आले होते. तसेच मेसच्या सुरक्षा शुल्कात वाढत करत ते १२ हजार रुपये करण्यात आले होते. त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्याला १७०० रुपये अतिरिक्त सेवा शुल्क विद्यार्थ्यांना देण्यास सांगितले होते. याविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले होते.
यानंतर विद्यापीठ प्रशासनानं शुल्कवाढीचा निर्णय मागे घेतला आहे. शिक्षण सचिव आर. सुब्रमण्यन यांनी ट्विट करुन याबद्दलची माहिती दिली. जेएनयूच्या प्रशासकीय समितीनं वसतिगृहाच्या शुल्कवाढीचा निर्णय मागे घेतल्याचं सुब्रमण्यन यांनी म्हटले होते. विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करुन पुन्हा वर्गांमध्ये जावं, असं आवाहन त्यांनी केलं होतं. तसेच केंद्र सरकारने तीन सदस्यीय समिती स्थापन करुन फी दरवाढीवर उपाय योजण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र फी दरवाढीचा मागे घेण्यासाठी आज संसदेवर मोर्चा काढण्यात आला होता.
आज हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस असून या अधिवेशनामध्ये ही फीवाढ मागे घेण्याचा निर्णय घेण्यात यावा अशी विद्यार्थ्यींनी मागणी केली होती. यासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात मोर्चा काढत निषेध केला. यामध्ये त्यांनी आपल्या मागण्यांचे फलक, डफल्या घेऊन गाणी गात आणि घोषणा देत सकाळी साडे अकराच्या सुमारास या विद्यार्थ्यांनी संसदेच्या रस्त्याने जात होता. मात्र वेळीच पोलिसांकडून विद्यार्थ्यांना रोखण्यात आले होते. यानंतर विद्यार्थी व पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक सुद्धा झाली होती.