जम्मू : नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील जवान राजेश केकाण व त्याची पत्नी शोभा (रा.चिंचोली, ता. सिन्नर) यांची या जवानाच्या सुरिंदर नावाच्या सहकाºयाने किश्तवार जिल्ह्यात गुरुवारी गोळ्या घालून हत्या केली. सुरिंदरने स्वत:च्या पत्नीलाही ठार मारले. पोलिसांनी सुरिंदरला अटक केली आहे.केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील (सीआयएसएफ) सुरिंदरला आपल्या पत्नीचे सहकाºयाशी विवाहबाह्य संबंध आहेत, असा संशय होता. त्यातून सुरिंदर व पत्नीत घरात वाद सुरू असताना राजेश केकाण व त्यांची पत्नी शोभा यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरिंदरने या तिघांनाही गोळ्या घातल्या.सुरिंदर तेलंगणातील असून २०१४ मध्ये तो सैन्यात भरती झाला होता. या घटनेने दोन्ही कुटुंबातील चार मुले अनाथ झाली आहेत. केकाण दाम्पत्याला दोन मुले आहेत. सीआयएसएफचे महासंचालक ओ.पी. सिंग म्हणाले की, सुरिंदरला निलंबित करण्यात आले आहे. सुरक्षा दल दोन्ही कुटुंबांतील मुलांची काळजी घेत आहे. (वृत्तसंस्था)
जवानाची पत्नीसह हत्या, काश्मीरमधील घटना, नाशिकमधील जवान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 4:47 AM