HM Amit Shah : देशाच्या राजकारणात चाणक्य समजले जाणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची एक अनोखा अंदाज समोर आली आहे. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर अमित शाह मंगळवारी सकाळी अहमदाबादच्या जगन्नाथ मंदिरात पोहोचले होते. येथे त्यांनी कुटुंबासह भगवान जगन्नाथाचे दर्शन घेतले आणि गायीची पूजा केली. यादरम्यान अमित शाह यांनी त्यांचा मुलगा जय शहा याला गोड सल्ला दिला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे ज्यामध्ये देशाचे गृहमंत्री वडीलांच्या भूमिकेत दिसत आहेत. अमित शाह यांचे हे रुप पाहून त्यांच्या पत्नीनेही आश्चर्य व्यक्त केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
गृहमंत्री अमित शहा आणि त्यांचा मुलगा आयसीसीचे चेअरमन जय शाह यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जय शाह यांच्या तीन दिवसीय गुजरात दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी अहमदाबादमधील जगन्नाथ मंदिरातील आरतीदरम्यान हा प्रकार घडला. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर साजऱ्या होणाऱ्या उत्तरायण सणानिमित्त अमित शहा कुटुंबासह जगन्नाथ मंदिरात पोहोचले. यावेळी त्यांनी येथे गौमातेचे दर्शन घेतले. अमित शाह जेव्हा त्यांच्या नातवाला आरती देत होते त्यावेळी नुकतेच वडील झालेले जय शाह थोडे जागरुक झाले आणि त्यांनी मुलाला थोडं मागे घेतलं. यावरुनच अमित शाह यांनी जय शाह यांना सल्ला दिला.
अमित शहा यांनी गौमातेची आरती केली. त्यानंतर त्यांनी जय शाह यांच्या मुलाला आरतीचा स्पर्श दिला. त्यावेळी नुकतेच वडील झालेल्या जय शाह यांनी हातातल्या बाळाला थोडं मागे घेतलं. यावर अमित शाह यांनी सर्वांसमोर जय शाह यांना काहीही होणार नाही, असं सुनावलं. 'कासू नही थे, तारे कोई नावो नये नो छोकरो छे,' असं अमित शाह म्हणाले. 'काहीही होणार नाही, तुझं बाळ काय नवजात नाही,' असं अमित शाह यांनी म्हटलं. अमित शाह यांचे हे विधान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून त्यावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. दुसरीकडे, यावेळी अमित शाह यांचे हे रुप पाहून त्यांची पत्नीही आश्चर्यचित झाल्या. त्यानंतर अमित शाह इतरांना आरती देण्यासाठी पुढे निघून गेले.
दरम्यान, यापूर्वीही अमित शाह यांनी एका आरती दरम्यान जय शाह यांना झापलं होतं. त्यावेळी जय शाह हे बीसीसीआयचे अध्यक्ष होते. पुजेदरम्यान जय शाह यांचे लक्ष नसल्याचं पाहून अमित शाहांनी त्यांना 'पुजेकडे लक्ष दे' असं सांगितलं होतं. त्या घटनेचाही व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता.