शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

जया बच्चन ममतांच्या गोटात; तृणमूलच्या तिकिटावर लढवणार निवडणूक?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 9:50 AM

समाजवादी पक्षाकडे केवळ एक खासदार निवडून आणण्याइतके संख्याबळ आहे.

नवी दिल्ली: समाजवादी पक्षाच्या राज्यसभेतील खासदार जया बच्चन या समाजवादी पक्षाची साथ सोडून तृणमूल काँग्रेसच्या गोटात दाखल होण्याची शक्यता आहे. येत्या 3 एप्रिलला जया बच्चन यांच्या राज्यसभेतील खासदारकीची मुदत संपुष्टात येत आहे. गेल्या तीन टर्म त्या समाजवादी पक्षाकडून राज्यसभेवर निवडून गेल्या होत्या. मात्र, राज्यसभेच्या आगामी निवडणुकीत जया बच्चन पश्चिम बंगालमधून तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढण्याची शक्यता आहे. तृणमूल काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. आगामी काही दिवसांतच पक्षाकडून याबद्दलची औपचारिक घोषणा होईल, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. येत्या एप्रिलमध्ये राज्यसभेतील 58 खासदारांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. यापैकी 10 जागा या उत्तर प्रदेशातील आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने 403 पैकी 312 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे भाजपाला या निवडणुकीत मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. तर विधानसभेत झालेल्या पराभवामुळे समाजवादी पक्षाकडे केवळ एक खासदार निवडून आणण्याइतके संख्याबळ आहे. त्यामुळे या जागेवर आत्तापासूनच अनेकांचा डोळा आहे.तर दुसरीकडे तृणमुलच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमचे चार खासदार यंदा निवृत्त होत आहेत. त्यामुळे अनेकजणांनी खासदारकीच्या उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. आम्ही यावेळी आमच्या किमान दोन खासदारांना राज्यसभेत निवडून आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे.उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जया बच्चन यांनी ममता बॅनर्जी यांना सूचक संदेश पाठवायला सुरूवात केली होती. जया बच्चन या मूळच्या बंगाली असून त्यांची लोकप्रियता अजूनही टिकून आहे. अनेकदा अमिताभ बच्चनदेखील जाहीर कार्यक्रमांमध्ये आपण 'बंगालचा जावई' असल्याचा उल्लेख करतात. गेल्यावर्षी भाजपाच्या एका कार्यकर्त्याने ममता बॅनर्जी यांना ठार मारणाऱ्याला 11 लाखांचे इनाम देण्याची घोषणा केली होती. त्यावेळी जया बच्चन यांनी भाजपावर कडाडून टीका केली होती. तुम्ही गायींना वाचवू शकता, पण तुमच्या राज्यात महिलांना अत्याचारांना बळी पडावे लागत आहे, असे बच्चन यांनी म्हटले होते. यानंतरच्या काळात अमिताभ आणि जया बच्चन यांनी कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आयोजनातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यामुळे जया बच्चन आणि ममता बॅनर्जी यांच्यातील जवळीक सातत्याने वाढत गेली. 

टॅग्स :Jaya Bachchanजया बच्चनAmitabh Bachchanअमिताभ बच्चनMamata Banerjeeममता बॅनर्जी