शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

बिहार निवडणुकीत जदयू रालोआसोबतच; नितीशकुमार यांनी केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2020 6:35 AM

बिहार विधानसभेची आगामी निवडणूक जदयू ‘रालोआ’सोबतच लढवील आणि २०० जागा नक्की जिंकेल

पाटणा : बिहार विधानसभेची आगामी निवडणूक जदयू ‘रालोआ’सोबतच लढवील आणि २०० जागा नक्की जिंकेल, असा विश्वास जदयूचे प्रमुख व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी रविवारी येथे व्यक्त केला.येथील ऐतिहासिक गांधी मैदानावर झालेल्या सभेत कुमार बोलत होते. ही सभा म्हणजे नितीशकुमार यांच्या ६९ व्या वाढदिवसानिमित्त केलेले शक्तिप्रदर्शन होते. ‘२०२० : फिनिश नितीश’ या राजदच्या घोषवाक्याला प्रत्युत्तर देण्यासाठी या सभेत ‘२०२० : फिरसे नितीश’ अशी प्रतिघोषणा देण्यात आली. राजद व काँग्रेसवर सडकून टीका करताना नितीशकुमार म्हणाले की, या पक्षांना अल्पसंख्य समाजाच्या फक्त मतांमध्ये स्वारस्य आहे. जदयू मात्र या समाजांच्या प्रगतीसाठी झटत असतो.आता राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाण देशात सर्वात कमी आहे, असा दावाही त्यांनी केला. भागलपूर दंगलीतील गुन्हेगारांना कायद्याचा बडगा दाखवून जदयूने दंगलग्रस्तांना न्याय देण्याचेही काम केले, असे ते म्हणाले. 

 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहार