शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

मोदींच्या कॅबिनेटमध्ये कोणत्या पक्षाला किती मंत्रीपदं? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 2:45 PM

मोदींच्या मंत्रिमंडळाबद्दल मोठी उत्सुकता

नवी दिल्ली: नरेंद्र मोदी 30 मे रोजी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत काही मंत्रीदेखील शपथ घेतील. त्यामुळे मोदींच्या मंत्रिमंडळात कोणा कोणाला स्थान मिळणार, कोणत्या खासदाराला कोणतं मंत्रिमंडळ दिलं जाणार याची चर्चा रंगू लागली आहे. यासोबतच एनडीएतील घटक पक्षांना किती मंत्रीपदं दिली जाणार, याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 2014 मध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर मोदींनी सर्व मंत्र्यांची नावं जाहीर केली नव्हती. यंदाही मंत्र्यांची नावं जाहीर होण्याची शक्यता कमीच आहे. यंदा एनडीएतील पक्षांची संख्या कमी असून प्रादेशिक पक्षांची कामगिरीदेखील चांगली झाली आहे. त्यामुळेच या पक्षांना मंत्रिमंडळात प्राधान्य दिलं जाऊ शकतं. याशिवाय मोदींच्या कॅबिनेटमध्ये 2 किंवा 3 महिला असू शकतात. एनडीएनं यंदा 353 जागा जिंकल्या आहेत. यातील 303 जागा भाजपाच्या आहेत. पक्ष             संभाव्य मंत्रीभाजपा           45+शिवसेना        3-4जदयू             3-4लोजपा            1आरएलपी       1आजसू            1अपना दल      1अकाली दल    1

जातीय समीकरण, प्रादेशिक गणितं आणि येत्या निवडणुका महत्त्वाच्या2019 मध्ये हरियाणा, झारखंड आणि महाराष्ट्रात निवडणूक आहे. तर दिल्ली, बिहार आणि पुद्दुचेरीत 2020 मध्ये निवडणूक होईल. हरियाणात गुर्जरांचं प्रमाण जास्त असल्यानं कृष्ण पाल गुर्जर यांना मंत्रीपद दिलं जाऊ शकतं. महाराष्ट्रात शिवसेनेची कामगिरी झाली आहे. याशिवाय विधानसभेची निवडणूकदेखील जवळ आली असल्यानं शिवसेनेला 3-4 मंत्रीपदं दिली जाऊ शकतात. झारखंडमध्येही निवडणूक होणार असल्यानं ऑल झारखंड स्टुडंट्स युनियनच्या खासदाराला मंत्रीपद दिलं जाऊ शकतं. पुढील वर्षी बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे एनडीएचा घटकपक्ष असलेल्या आणि 17 पैकी 16 जागांवर विजयी झालेल्या संयुक्त जनता दलाला 3-4 मंत्रीपद मिळू शकतात. राजस्थानातील आरएलपीच्या एकमेव खासदाराला मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीShiv SenaशिवसेनाBJPभाजपाJanta Dal Unitedजनता दल युनायटेड