शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

बिहारमध्ये 'जयदु'चे नितीशकुमारच मोटा भाई, भाजपा लढवणार एवढ्या जागा?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 4:54 PM

बिहारमध्ये सत्तारूढ एनडीए एकजूट असल्याचा दावा करणारा भाजप नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार करण्यावर आग्रही होती. बिहार आणि इतरत्र विरोधी पक्षांचा अजिबात मागमूस नाही. जनता आशेने पाहणारा भाजपच एकमेव पक्ष आहे, असा दावा नड्डा यांनी केला

ठळक मुद्दे बिहारमध्ये सत्तारूढ एनडीए एकजूट असल्याचा दावा करणारा भाजप नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार करण्यावर आग्रही होती. बिहार आणि इतरत्र विरोधी पक्षांचा अजिबात मागमूस नाही. जनता आशेने पाहणारा भाजपच एकमेव पक्ष आहे, असा दावा नड्डा यांनी केला

मुंबई - बिहार विधानसभेची आगामी निवडणूक राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) भाजप, जेडीयू आणि लोजप हे तीनही घटक पक्ष एकत्र लढणार आहेत. त्यासाठी, मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार नितीशकुमार यांची निवड झाल्याची घोषणा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली. नड्डा  जेडीयू आणि चिराग पासवान यांच्या लोजपदरम्यान कुरबूर चालू असताना बिहार प्रदेश भाजप कार्यकारिणी बैठकीच्या समारोप सत्रात व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यामातून संबोधित करताना नड्डा यांनी उपरोक्त स्पष्टोक्ती दिली. आता, जागावाटपाचा फॉर्म्युला कसा ठरला, यावरुन चर्चा सुरू आहे. मात्र, 110, 100 आणि 33 जागांवर ही महाआघाडी निश्चित झाल्याचे समजते. 

बिहारमध्ये सत्तारूढ एनडीए एकजूट असल्याचा दावा करणारा भाजप नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार करण्यावर आग्रही होती. बिहार आणि इतरत्र विरोधी पक्षांचा अजिबात मागमूस नाही. जनता आशेने पाहणारा भाजपच एकमेव पक्ष आहे, असा दावा नड्डा यांनी केला. विरोधी पक्षांकडे कोणतीही तत्त्वे नाहीत, दृष्टिकोनही नाही. तसेच जनतेची सेवा करण्याची भावना विरोधकांच्या ठायी नाही. आम्ही निश्चित विजयी होऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

बिहार विधानसभेसाठी हे तिन्ही पक्ष एकत्र आल्याने भाजपा किती जागांवर निवडणूक लढवणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यानुसार, 110, 100 आणि 33 जागांवर ही महाआघाडी निश्चित झाल्याचे समजते. म्हणजे, जनता युनायडेट दल 110, भाजपा 100 आणि लोकजनशक्ती पार्टी 33 जागांवर आपले उमेदवार निश्चित उभे करणार आहे. याबाबत अद्याप घोषणा केली नाही, पण लवकरच जागावाटपांचा फॉर्म्युला ठरल्याचे घोषणा होऊ शकते असे सांगण्यात येत आहे. बिहारमध्ये गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत असलेला जदयु बिहारच्या राजकारणात मोठा भाऊ आहे. यंदाही मोठ्या भावाची जागा बिहारलाच मिळणार आहे.  

निवडणूक वेळेवरच होईल...

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी काही राजकीय पक्षांकडून होत असताना बिहार विधानसभेची निवडणूक वेळेवर होईल, असे निवडणूक आयोगाच्या उच्चपदस्थ सूत्रांनी स्पष्ट केले. बिहार विधानसभेची मुदत २९ नोव्हेंबरला संपणार आहे. आॅक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान निवडणूक होईल, असेही संकेत आहेत. अलीकडेच निवडणूक आयोगाने कोरोनाच्या काळात निवडणुका घेण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. नियम पाळून निवडणूक प्रक्रिया पार पडेल. 

टॅग्स :Biharबिहारvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकBJPभाजपाNitish Kumarनितीश कुमार