पाटणाः बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयकाचं समर्थन करणार नसल्याचं जाहीर केलं आहे. जेडीयूचे वरिष्ठ नेते आणि बिहारचे मंत्री श्याम रजक म्हणाले, जनता दल युनायटेड तिहेरी तलाक विधेयकाच्या विरोधात आहे. आमच्या याच्याविरोधात कायम उभे राहू. तिहेरी तलाक हा एक सामाजिक मुद्दा आहे. हा समाजात बसून सोडवला पाहिजे. रजक म्हणाले, राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयकाच्या विरोधात मत दिलं आहे.तत्पूर्वी नितीश कुमार यांनी सार्वजनिकरीत्या तिहेरी तलाक विधेयकाला विरोध केला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी नितीश कुमार यांनी कलम 370ला हटवणं, समान नागरी कायदा, अयोध्येत राम मंदिर निर्माणाचा मुद्दा चर्चेद्वारे सोडवला पाहिजे. कलम 370 हटवू नये, असा आमचा विचार आहे. तसेच समान नागरी कायदा हा जनतेवर लादण्यात येऊ नये, असं ते म्हणाले होते. तिहेरी तलाक विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळाली असून, आज ते राज्यसभेत मांडण्यात येणार आहे. देश पुढे जात आहे, त्यासाठी हे विधेयक महत्त्वाचं असल्याचंही जावडेकर म्हणाले आहेत.
तिहेरी तलाक विधेयकाचं समर्थन करणार नाही, नितीश कुमारांचा पवित्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 11:55 AM