शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

जेईई अ‍ॅडव्हान्समध्ये पुण्याचा चिराग फलोर टॉपर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2020 1:58 AM

टॉप ११ मध्ये मुंबई विभागातून पाच; कनिष्का मित्तल विद्यार्थिनींमध्ये सर्वप्रथम

- एस. के. गुप्ता नवी दिल्ली : आयआयटीने (दिल्ली) सोमवारी जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेच्या जाहीर केलेल्या निकालात पुण्याच्या चिराग फलोर याने ३९६ पैकी ३५२ गुण मिळवून भारतात पहिला क्रमांक मिळवला. रँकिंगमध्ये १७ व्या पायरीवर असलेल्या आयआयटी (रुडकी) झोनमधून कनिष्का मित्तलने विद्यार्थिनींमध्ये ३९६ पैकी ३१५ गुण मिळवून पहिले स्थान मिळवले.या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे आयआयटी (मुंबई) झोन सर्वश्रेष्ठ राहिला. परंतु, टॉप ५०० मध्ये सगळ््यात जास्त १४० विद्यार्थी आयआयटी (मद्रास)चे आहेत. आयआयटी मुंबई झोनमधील टॉप ५०० मध्ये समाविष्ट विद्यार्थ्यांची संख्या १०४ राहिली. टॉप ११ विद्यार्थ्यांपैकी टॉप ५ आयआयटी मुंबई झोनचे आहेत. त्यात चिराग फ्लोर रँक-१, आर. मुहेंद्र राज रँक-४, वेदांग धीरेंद्र आश्गोंकर रँक-७, स्वयंम चुबे रँक-८ आणि हर्ष शाह रँक-११ यांचा समावेश आहे. आयआयटी (दिल्ली)चे संचालक प्रो. व्ही. रामगोपाल राव यांनी ‘लोकमत’ ला सांगितले की, जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी देशभरात १६०८३८ विद्यार्थ्यांनी नाव नोंदवले होते. त्यातील १५०८३८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात ११७९८७ विद्यार्थी व ३२८५१ विद्यार्थिनी होत्या. ४३२०४ विद्यार्थी व ६७०७ विद्यार्थिनी यशस्वी ठरल्या. टॉप १०० मधील विद्यार्थ्यांना हवा तो अभ्यासक्रम मिळेल.नोंदणी करावी लागेलयशस्वी विद्यार्थ्यांना ज्वॉइंट सीट अलोकेशन अ‍ॅथॉरिटीत नोंदणी करावी लागेल. जागा गुणवत्तेच्या आधारावर दिल्या जातील. सहा आॅक्टोबरपासून काउंसलिंग प्रक्रिया सुरू होईल. यंदा ७ टप्प्यांऐवजी ६ टप्प्यांतच काउंसिलिंग केले जाईल.मुंबई झोनचे १०४ विद्यार्थी500 रँक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांत आयआयटी मुंबई झोनमधील १०४ विद्यार्थी-विद्यार्थिनी आहेत. त्यातील २४ टॉप १०० मध्ये, ४१ टॉप २०० मध्ये, ६३ टॉप ३०० मध्ये, ८२ टॉप ४०० मध्ये आहेत. आयआयटी दिल्ली झोनमधून टॉप ५०० मध्ये ११० विद्यार्थी आहेत. त्यात २२ टॉप १०० मध्ये, ४६ टॉप २०० मध्ये, ७१ टॉप ३०० मध्ये आणि ९२ टॉप ४०० मध्ये समाविष्ट आहेत.