नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आलेल्या जेईई मेन्स आणि नीट या दोन्ही महत्त्वाच्या परीक्षांची तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा बारावीची परीक्षा दिलेल्या लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे.
मंगळवारी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी जेईई मेन्स आणि नीट परीक्षेची तारीख जाहीर केली. त्यानुसार, नीट परीक्षा 26 जुलै रोजी होणार आहे. तर जेईई मेन्स परीक्षा 18 ते 23 जुलैला होणार आहे.
दरम्यान, दरवर्षी लाखो विद्यार्थी मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या यूजी कोर्सेसच्या प्रवेशांसाठी नीट आणि जेईईं या पात्रता परीक्षा देतात. यंदा बारावीच्या परीक्षा दिलेल्या लाखो विद्यार्थांना या परिक्षांची प्रतीक्षा होती. मात्र, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नीटची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. तर, नीट परीक्षेपूर्वी जेईईची परीक्षाही स्थगित करण्यात आली होती.